पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी (९ नोव्हेंबर) सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सहा तासांचा ब्लॉक राहणार आहे. काही काळापूर्वी हा ब्लॉक सुरू करण्यात आला आहे. येत्या सहा तासांत महाराष्ट्र रेल्वे विकास निगम चिखले पुलाजवळ गर्डर टाकण्याचे काम करणार आहे. या कामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) पुणे ते मुंबई एक्स्प्रेस वेवरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. त्याऐवजी पर्यायी मार्ग खुले करण्यात आले आहेत. या सहा तासांसाठी सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी आणि जड वाहने) वाहतूक बंद करण्यात आली आहे.
ट्रॅफिक ब्लॉक : द्रुतगती मार्गावर मुंबई बाजूला ढेकू गावाजवळ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत महामार्ग वाहतूक व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत गॅन्ट्रीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. त्यासाठी गॅन्ट्री बसविण्याचे काम बुधवारी (१७ नोव्हेंबर) दुपारी दोन ते अडीच वाजेपर्यंत करण्यात आले. त्यामुळे या मार्गावर ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला होता. राज्य परिवहन विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी वाहतूक कोंडीबाबत अधिसूचना जारी केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीसाठी एक्स्प्रेस वेवरील वाहतूक अन्य पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली आहे जेणेकरून वाहनचालकांची गैरसोय होऊ नये..
कोणते असणार पर्यायी मार्ग :
- मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे येणारी हलकी वाहने मुंबई लेन कि.मी. ५५.००० वरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून नेता करता येतील.
- मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे येणारी हलकी वाहने व बस मुंबई लेन कि.मी. ३९.८०० खोपोली एक्झिट वरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून नेता येतील.
- मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे येणारी सर्व प्रकारची वाहने ही खालापूर टोल नाका शेवटच्या लेन ने खालापूर एक्झिट कि.मी. ३२.५०० येथून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोल नाका मार्गे मुंबई वाहिनीवरून नेता येतील.
- मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे येणारी सर्व प्रकारची वाहने मुंबई लेन कि.मी. ९.६०० पनवेल एक्झिट वरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून करंजाडे मार्गे कळंबोली अशी नेता येतील.
- मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे येणारी सर्व प्रकारची वाहने शेडुंग फाट्यावरून पनवेलच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येतील.
हेही वाचा :