पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 410 मुंबई लेनवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झालेली असून पुण्यावरुन मुंबईला जाणाऱ्या तीन लेन बंद झालेल्या आहेत. त्यामुळ तिनही लेनवरची वाहतूक सध्या ठप्प आहे. सध्या एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पुणे महामर्गावर सध्या महामार्गावर वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. उर्से टोलनाक्यावरील वाहतूक कोंडी काही प्रमाणात सुरळीत झाली आहे.
वाहतूक कोंडी : लोणावळ्यजवळील बोरघाटात धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे. मात्र प्रशासनाकडून आता कोसळलेल्या दरडी हटवण्यासाठी महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. आज पुन्हा कुसेगाव सिंहगड कॉलेजजवळ छोटी दरड कोसळली आहे. सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे तळेगावपासून वाहनाच्या रांगा या भागात लागल्या आहेत. महामार्ग यंत्रणेकडून दरड हटवण्याचे काम सूरू आहे. टोलनाक्यावर वाहतूक कोंडी झाली आहे.
मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद : दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ण पणे ठप्प झाली होती. पावसामुळे रस्त्यावरील राडारोडा बाजूला करण्यास अडथळे निर्माण देखील होत होते. मात्र पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत काम करून मुंबईकडे जाणाऱ्या दोन लेन आता वाहतुकीसाठी खुल्या केल्या आहेत. मात्र अद्यापही रस्त्यावर राडारोडा पडला आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 2 यावेळेत मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
मार्गिका बदलण्याचे काम सुरु : पुणे जिल्ह्यातील लोणावळा भागात पावसाचा सर्वात जास्त जोर आहे. विक्रमी पावसाची नोंद या भागात केली जात आहे. मात्र आता ही दरड कोसळल्याने या मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ण पणे ठप्प झाली आहे. पोलिसांकडून दरड काढण्याचे काम सुरू आहे. त्यात पावसामुळे अनेक अडथळे निर्माण होत आहे. महामार्ग वाहतूक यंत्रणेच्या वतीने मार्गिका बदलण्याचे काम सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा :