ETV Bharat / state

Mumbai Pune Expressway Block : ऐन दिवाळीच्या तोंडावर मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर 'ब्लॉक'; 'हे' आहेत पर्यायी मार्ग - Diwali Festival

Mumbai Pune Expressway Block : ऐन दिवाळीच्या तोंडावर मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आज सहा तासांचा ब्लॉक घेण्यात येत असल्यानं या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.

Mumbai Pune Expressway Block
Mumbai Pune Expressway Block
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 12:36 PM IST

पुणे Mumbai Pune Expressway Block : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज सहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत केला जाणार आहे. यादरम्यान सर्व प्रकारची वाहने, हलकी व जड-अवजड वाहने यांची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडोरचं काम करण्यासाठी आज हा ब्लॉक घेतला जाणार आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर ब्लॉक घेण्यात आल्यानं प्रवाशांचे हाल होणार आहेत.

ब्लॉकदरम्यान सर्व वाहतूक बंद : ब्लॉकदरम्यान या एक्सप्रेसवरील वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आलीय. 340 कोटींचा हा प्रकल्प आहे. यात सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे अपघात आणि वाहतूक कोंडीवर नजर ठेवली जाईल. अशावेळी द्रुतगती मार्गावरुन धावणाऱ्या वाहनांना सेन्सरद्वारे अपघात अथवा वाहतूक कोंडीची माहिती पोहोचणार आहे. या ब्लॉकमुळे मुंबईकडे येणारी हलकी वाहने खोपोली एक्झिट वरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 या मार्गावरून मार्गस्थ करण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान या एक्सप्रेस वे वरील सर्व वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

यापुर्वीही घेण्यात आला ब्लॉक : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर यापूर्वी दिशादर्शक फलक बसवण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला होता. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातांमध्ये अनेक प्रवाशांनी आपला जीव गमावलाय. त्यामुळं इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टिमच्या माध्यमातून वाहतुकीचं नियंत्रण भविष्यात सॅटेलाईटद्वारे केलं जाणार आहे. महामार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीचा रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवली जाणार आहे. अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोहोचणार आहे.

पर्यायी मार्ग कोणते :
- मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुण्याकडून मुंबईकडे येणारी वाहने मुंबई लेन पनवेल एक्झिटवरून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रं. 48 या मार्गावर करंजाडेमार्गे कळंबोली अशी वळविण्यात येतील.
- मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रं. 48 वरून पुण्याकडून मुंबईला येणारी वाहने शेडुंग फाट्यावरून बोर्ले टोल नाक्याकडे न येता सरळ पनवेलच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येतील.
- मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुण्याकडून मुंबईकडे येणारी हलकी वाहने खोपोली एक्झिटवरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रं. 48 वरून मार्गस्थ करण्यात येतील.

हेही वाचा :

  1. Mumbai Pune Express Highway Toll : मुंबई - पुणे महामार्गावर 10 हजार वाहने बुडवतात 'टोल'? काय आहे नेमका हा 'झोल' जाणून घ्या
  2. Toll Collection From MSRDC : राज्यात टोल वसूलीच्या नावाखाली लुटमार सुरूच, 'एमएसआरडीसी' विरोधात उच्च न्यायालयात याचिका
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.