ETV Bharat / state

Mumbai Pune Expressway Accident : कंटेनर उलटल्यानं मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू - मुंबई पुणे महामार्गावर अपघात

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास झाला.

Mumbai Pune Expressway Accident
कंटेनर उलटल्यानं मुंबई पुणे महामार्गावर अपघात
author img

By

Published : Aug 21, 2023, 12:37 PM IST

पुणे- कंटेनर उलटल्यानं मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघात चार प्रवाशांपैकी दोघांचा मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितलं.पुणे- मुंबई द्रुतमार्गावर आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मुंबईकडे जाणारा एक कंटेनर पलटला. या अपघातात कंटेनरनं पाच वाहनांना धडक दिली आहे. यामध्ये कारमधील एक चालक आणि एक महिला अशा दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर या दुर्घटनेमध्ये इतर काही जण देखील जखमी झाले आहेत.

कंटेनर पुण्याहून मुंबईकडं जात असताना लोणावळ्याच्या हद्दीत कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटले. त्यानंतर कंटेनर दुसऱ्या लेनवर जाऊन पलटला. यादरम्यान कंटेनरनं काही वाहनांना धडक दिली. कारमधील चालक आणि एक महिला यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर इतर अन्य दोन महिला जखमी झाले आहेत. संथ गतीने प्रवास सुरू-महामार्ग पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि बचावदल पोहोचले. त्यांनी तात्काळ जखमींना एमजीएम रुग्णालय कठोके येथे दाखल केले. इतर पाच वाहनांना धडक बसली आहे. मात्र त्यामधील प्रवासी सुरक्षित आहे. या दुर्घटनेनंतर काही काळ मुंबई आणि पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला. सध्या, पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर संथ गतीने वाहतूक सुरू आहे.

नागपुरात अपघाताचा व्हिडिओ व्हायरल- नुकतेच नागपूरमध्ये भरधाव जाणाऱ्या कारने दुचाकीस्वाराला धडक देत दुचाकीला 3 किलोमीटर फरफटत नेल्याची घटना राजीवनगर परिसरात घडली. अपघात झाल्यानंतर पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन तरुण दुचाकीवरुन वर्धा मार्गाने एका हॉटेलकडे जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या कारनं त्यांच्या दुचाकीला धडक दिली. कार चालकाने कार न थांबवता 3 किलोमीटरपर्यंत दुचाकी फरफटत नेल्याचा व्हिडिओ समार आला. सुदैवानं दुचाकीवरील दोन्ही तरुण सुखरुप आहेत.

महामार्ग संमोहनानं वाढले अपघात - अपघातासाठी 'महामार्ग संमोहन' जबाबदार असल्याचा दावा करण्यात येतो. एखादा महामार्ग सरळ एका रेषेत अअसल्यानं त्यात जास्ती वळणे नसतात. त्या महामार्गावर वाहन सरळ एकमार्गे एकाच वेगात अनेक तास धावत असताना मेंदू सक्रिय नसतो. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या शरीराची हालचाल स्थिर होते. त्या स्थितीला 'महामार्ग संमोहन' असे म्हणतात. हा प्रकार अनेकदा महामार्गावरील चालकांसोबत घडत असल्याने अपघात होत असल्याचा दावा करण्यात येतो.

हेही वाचा-

  1. Ladakh Accident : सातार्‍याचा जवान लडाखमधील दुर्घटनेत शहीद, फलटण तालुक्यावर शोककळा
  2. Jalna Crime News: जालना रेल्वे रूळावर दगडानं भरलेला ड्रम ठेवणारा 'तो' अखेर गजाआड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.