पुणे: शुभम पाटील हा मूळचा गेल्या 4 वर्षापासून पुण्यातील शिवाजीनगर गावठाण येथील प्रसन्न अभ्यासिका येथे अभ्यास करत आहे. यावेळी त्याच्याशी बातचीत केली असता तो म्हणाला आजचा निकाल पाहून खूपच आनंद झाला आहे. माझ्या आई-वडिलांनी माझ्या भविष्यासाठी परिश्रम घेतले. तसेच भाऊ आणि बहीण यांची खंबीर साथ मिळाली. तसेच मित्र मंडळी यांनी देखील दिलेली साथ यामुळे आज मी पास झालो आहे. मला अपेक्षा होती की, ज्या पद्धतीने मी तयारी केली आहे त्यानुसार मी प्रथम पाचमध्ये येणार. पण जेव्हा निकाल बघितला की मी दुसरा आलो आहे, मला खूपच आनंद झाला. आत्ता निकाल बघून थोडेसे दुःख आहे की, मी प्रथम आलो नाही. प्रामुख्याने यात सातत्य असणे खूपच गरजेचे आहे, असे यावेळी शुभम याने सांगितले आहे.
चौगुले 633 मार्कांसह राज्यात पहिला: मंगळवारी एमपीएससी राज्यसेवा 2021 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये प्रमोद चौगुले हा 633 मार्कांसह राज्यात पहिला आला आहे. तर शुभम पाटील याला 616 मार्क मिळाले आहेत. शुभम पाटील दुसरा आला आहे. मुलींमध्ये सोनाली मेत्रे पहिली आहे. सोनालीला तिसरा क्रमांक मिळाला आहे.
405 जागांसाठी निवड यादी जाहीर: राज्यात एमपीएससी अंतर्गत उपजिल्हाधिकारी पोलीस उपाधिक्षक तहसीलदार सह 20 पदांच्या 405 जागांसाठी निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. संबंधित निकालाची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रशासनाने संवर्गाचे पसंतीक्रम सादर करण्याकरिता 3 मार्च 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. अशी माहिती आयोगाने दिली आहे. विद्यार्थी आता पुढील तयारीसाठी सरसावले आहेत.
विद्यार्थ्यांची नाराजी: राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी 2 जानेवारी 2022 ला घेण्याचे ठरवले होते. या परीक्षेत अनेक उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली असल्यामुळे परीक्षेस बसण्याची संधी हुकली होती. त्यामुळे अशा उमेदवारांना एक संधी मिळावी म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी समाज माध्यमावर नाराजी व्यक्त करत आयोगाचा ट्विटर अकाउंटवर संताप व्यक्त केला होता.
अशा विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने रविवारला पार पडणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा करताच परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर टीकेचा भडीमार सुरु केला होता. रागाच्या भरात अश्लील भाषेत टीका-टिप्पणी करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात एमपीएससी प्रशासनाने कठोर पवित्रा घेतला होता. अश्लील टीकाखोर अर्जदारांवर कारवाई करण्याचा फतवाच एपीएससी प्रशासनाने प्रसिद्ध केला होता. त्यानुसार दोषी विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी किंवा विशिष्ट कालावधीसाठी परीक्षेला बसून देणार नाही. निवड प्रक्रियेतून बाहेर केल्या जाणार होता. त्यामुळे आता जहाल भाषेत टीका केलेल्या विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले होते.