ETV Bharat / state

Sunil Tatkare : अजित पवार मुख्यमंत्री होणार? सुनील तटकरेंनी थेटच सांगितले...Watch Video

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही राज्य सरकारमध्ये सहभागी झालो तेव्हाच मुख्यमंत्रिपदाबाबत स्पष्टाता झाली. आम्ही एनडीएचा घटक पक्ष आहोत. अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी राज्यातील अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आणि आशा आहे. मात्र, आता मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा राहिलेला नाही, असे तटकरे म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.

Sunil Tatkare
Sunil Tatkare
author img

By

Published : Jul 23, 2023, 10:17 PM IST

Updated : Jul 23, 2023, 10:39 PM IST

सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया

पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केले. त्यानंतर त्यांनी शिवसेना-भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अलीकडेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एनडीएच्या बैठकीत भाग घेतला. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विरोधकांची मोर्चेबांधणी करत आहेत. याबाबत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी 5 तारखेला आपल्या नव्या भूमिकेबाबत सांगितले आहे. एनडीएच्या माध्यमातून राज्यात आणि देशात काम करण्याचा आमचा मानस असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा संपला : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेबाबत सुनील तटकरे म्हणाले की, आम्ही राज्य सरकारमध्ये सहभागी झालो तेव्हाच मुख्यमंत्रिपद स्पष्टता झाली आहे. आम्ही एनडीएचा घटक पक्ष आहोत. अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी राज्यातील अनेक कार्यकर्त्यांची इच्छा, अपेक्षा आहे. पण आता आमची महाआघाडी झाली आहे, त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा राहिलेला नाही असे तटकरे म्हणाले.

निधी देऊन सर्वांना न्याय : विनायक राऊत यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता तटकरे म्हणाले की, संजय राऊत आणि विनायक राऊत यांनी जे काही सांगितले त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. आम्ही टीकेपासून दूर राहून राज्याच्या विकासाला प्राधान्य देऊ. तसेच दीपक केसरकर आणि आम्ही एकत्र काम केले आहे. आम्ही सकारात्मक काम करू. तसेच निधीबाबत कोणी नाराज नाही. शिवसेनेच्या आमदारांनी ही नाराजी व्यक्त केलेली नाही. आता कोणाची नाराजी आहे, यावर बोलणे मला योग्य नाही. राष्ट्रवादीच्या आमदारांनी निधी देऊन सर्वांना न्याय दिला आहे. असेही तटकरे यावेळी म्हणाले.

हेही वाचा - NCP Women Front Protest: मणिपूरच्या घटनेवर चित्रा वाघ गप्प का? राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचा सवाल

Last Updated : Jul 23, 2023, 10:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.