ETV Bharat / state

Kasba Bypoll : ऑक्सिजन सिलेंडरसह व्हीलचेअरवर येत खासदार गिरीश बापट यांनी बजावला मतदानाचा हक्क - Girish Bapat voted in Kasba Bypoll

गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी कसबा पोटनिवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. व्हीलचेअरवर ऑक्सीजन सिलेंडर लावून खासदार गिरीश बापट यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

MP Girish Bapat voted
खासदार गिरीश बापट
author img

By

Published : Feb 26, 2023, 8:13 PM IST

खासदार गिरीश बापट यांनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुण्याचे खासदार गिरीश बापट हे आजारी असून राज्यातील सर्वच नेते मंडळी यांनी त्यांची भेट घेतली आहे. कसबा पोट निवडणुकीत बापट आजारी असताना देखील त्यांनी पक्षासाठी प्रचार केला. आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बापट यांनी पुण्यातील अहिल्यादेवी हायस्कूल येथे येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.

बजावला मतदानाचा हक्क: कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला शेवटची काही मिनिटे बाकी असताना अखेर गिरीश बापट यांनी मतदानासाठी हजेरी लावली. कसबा मतदार संघातील अहिल्यादेवी हायस्कूल गर्ल्स शनिवार पेठ येथे संध्याकाळी 5 वाजता मतदानासाठी खासदार गिरीश बापट उपस्थित राहिले. खासदार गिरीश बापट हे आजाराशी झुंज देत असताना देखील मतदान करण्यासाठी बाहेर आले. त्यामुळे त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले होते. गेले 25 वर्ष ते याच प्रभागातून आमदार होते व आता खासदार देखील आहेत. त्यामुळे त्यांचे मत हे महत्वाचे मानले जात आहे.

प्रचारात देखील राहिले होते उपस्थित: गिरीश बापट हे प्रचारात देखील एक दिवस हजर होते. आजारी असताना देखील बापट प्रचारात सहभागी झाल्यानंतर विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका देखील केली होती. पोस्टल मतदान असताना देखील आज गिरीश बापट यांनी मतदानाचा हक्क बजावला. अनेक दिवसांपासून बापट हे आजारी आहेत. आज मतदानासाठी येताना त्यांना व्हीलचेअरवर बसवून घेऊन जाण्यात आले. यावेळी त्यांच्या नाकाला ऑक्सिजनचे पाईप देखील लावलेले होते.

टिळक कुटुंबियांनी मतदान केले: कसबा पोटनिवडणूकीत दिवगंत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबामध्ये भारतीय जनता पक्ष तिकीट देईल, असे सर्वांना वाटत होते. भारतीय जनता पक्षाने मात्र कसबा पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी हेमंत रासनेंना दिल्याने ब्राह्मण समाज आणि टिळक कुटुंब नाराज असल्याचे समोर आले होते. आज मतदानाच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्य शैलेश टिळक, कुणाल टिळक, त्यांची मुलगी आणि त्यांच्या सुनबाई यांनी मतदान केंद्रात उपस्थित राहत मतदानाचा हक्क बजावला. आज मतदान करताना मात्र दिवगंत मुक्ताताई टिळक यांची आठवण येत आहे, प्रत्येक वेळेस त्यांची आठवण राहणार, अशा भावना यावेळी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्या आहेत.

पोटनिवडणूकीसाठी मतदान: कसबा पोटनिवडणुकीत मतदान संपले आहे. तरी दोन्ही पक्षाकडून मोठ्या प्रमाणात एकमेकांवर आरोप करताना राजकीय नेते दिसून आले. तसेच कसबा मतदार संघात जे संवेदनशील भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणात गोधळ निर्माण झाला होता. कसबा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशी अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या.

हेही वाचा: Kasba ByPoll: कसबा पोटनिवडणूक; माजी मंत्री आमने-सामने; केले एकमेकांवर गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.