ETV Bharat / state

Girish Bapat on Kasba Bypoll : नाकाला ऑक्सिजनची नळी; गिरीश बापट व्हिलचेअरवरून प्रचाराच्या मैदानात, विरोधक म्हणाले 'माणसापेक्षा भाजपाला...' - Girish Bapat was Moved to Tears

पुणे जिल्ह्याचे भाजपचे नेतृत्व म्हणून ओळख असलेले खासदार गिरीश बापट गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी आहेत. भाजपाचे आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यामुळे, पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत गिरीश बापट नसल्यामुळे भाजपला मोठी कमतरता जाणवत होती. त्यामुळे आता भाजपने गिरीश बापट यांना आजारी असतानासुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली केसरीवाड्यात मेळावा घेतला. या मेळाव्यात मोठ्या संख्यने कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपाने खासदार गिरीश बापटांना प्रचारात सहभागी केल्याने काँग्रेससह राष्ट्रवादीकडून टीका केली जात आहे. माणसापेक्षा भाजपाला निवडणूक महत्त्वाची आहे, असे विरोधकांनी म्हटले आहे.

MP Girish Bapat Guided on Kasaba
थोडी जास्त ताकत लावा, विजय पक्का, जिंकल्यानंतर पेढे घेऊन मी परत येतो : खा. गिरीश बापट
author img

By

Published : Feb 16, 2023, 8:32 PM IST

Updated : Feb 16, 2023, 10:40 PM IST

पुणे : राज्यस्तरावरचे अनेक नेत्यांनी कसबा निवडणुकीत सहभाग घेऊन, ही पोट निवडणूक मोठी प्रतिष्ठितेची केलेली आहे. स्वतः देवेंद्र फडवणीस यांनी काल गिरीश बापट यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज गिरीश बापट यांनी अगदी व्हिलचेअर वर येऊन भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचेसाठी मार्गदर्शन मेळावा घेतला. नाराज उमेदवार, कार्यकर्ते यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. त्यामुळे केसरी वाड्यात हा मार्गदर्शनपर मेळावा घेण्यात आला

गिरीश बापट यांनी व्यक्त केले मनोगत : मेळाव्याला मार्गदर्शन करतान बापट म्हणाले, 1968 पासून मी भाजपाचा कार्यकर्ता आहे. त्याचे तुम्ही सगळे साक्षीदार आहात. निवडणूक चुरशीची वगैरे काही होणार नाही. आपला विजय पक्का आहे. थोडी ताकद लावा कार्यकर्त्यांनी दिलेले काम मनापासून करा, विजय हा निश्चित होणार असल्याचे गिरीश बापट यावेळी म्हणाले आहे.

खासदार गिरीश बापट

मुक्ता टिळकांविषयी भावनिक उद्गार : मुक्ता टिळक येथे नाहीत, त्यांच्याशिवाय मी आलो आहे. मी हे शब्दात सांगू शकणार नाही. असे म्हणत गिरीश बापट यांना यावेळी अश्रू अनावर झाले होते. परंतु, वेळ बदलते काळ, वय बदलते, निवडणूक येतात-जातात कधी पराभव होतील, कधी जिंकू पण हा विजय निश्चित आहे. तो मोठ्या फरकाने आपण विजयी होऊ. विजयी झाल्यानंतर मी स्वतः तुम्हाला पेढे घेऊन द्यायला येईन, असे म्हणत गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी असलेले खासदार गिरीश बापट यांनी एक प्रकारे कार्यकर्त्यांचे स्फुरण वाढवण्याचे काम केलेले आहे.

अगदी मोजक्या शब्दांत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन : कसबामध्ये पोट निवडणूक लागलेली आहे. या कसबा विधानसभा मतदारसंघाचे गिरीश बापट पंचवीस वर्षे प्रतिनिधित्व करीत होते. त्यामुळे गिरीश बापटांचा सहभाग हा महत्त्वाचा मानला जात होता. एकीकडे महाविकास आघाडीची भक्कम ताकद आणि त्या ताकतीला तोंड देण्यासाठी भाजपकडे गिरीश बापट नाहीत, असा प्रचार विरोधकांकडून केला जात होता. त्यामुळे गिरीश बापट यांनी दोन शब्द बोलणार हे फार महत्त्वाचे होते. त्यांनी आज अगदी मोजक्या शब्दांत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये उत्साह भरण्याचे काम केलेले आहे.

भाजपने गिरीश बापटांना मैदानात उतरवले : कसब्याची निवडणूक भारतीय जनता पार्टीला थोडी अवघड जाईल, असे वाटत असल्यामुळे भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकतीने यात उतरली आहे. कुठेही धोका पत्करता येत नाही, त्यामुळे भारतीय जनता पक्षाने अखेर गिरीश बापटांना मैदानात उतरवले आहे. तेसुद्धा या ठिकाणी येऊन भावनिक आव्हान करून स्वतः मुक्ता टिळक यांच्या आठवणीने ते भाऊक झाले होते.

पहिल्यांदाच गिरीश बापट यांच्याशिवाय ही निवडणूक : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यामध्ये पहिल्यांदाच गिरीश बापट यांच्याशिवाय ही निवडणूक होत आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपचा पराभव करेल असे वाटत आहे. भाजपाने आज गिरीश बापट यांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. काल स्वतः गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनीसुद्धा त्यांची भेट घेतली होती. त्यांचीसुद्धा नजर या कसबा विधानसभा मतदारसंघावर असल्याने आज भाजपने गिरीश बापट यांना अगदी व्हिलचेअरवर त्यांची तब्येत योग्य नसतानासुद्धा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले. त्यामुळे भाजप कुठलीही प्रचाराची संधी सोडत नाही, असेच यातून दिसत आहे.

भाजपसाठी गिरीश बापटांचे मार्गदर्शन संजीवनी : भाजपच्या उमेदवारीवरून मुक्ता टिळक यांच्या घरातील शैलेश टिळक आणि कुणाल टिळक हे नाराज होते. परंतु, ही नाराजीसुद्धा आज गिरीश बापट यांचा मार्गदर्शन मेळावा केसरी वाड्यात घेऊन दूर करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे. एक प्रकारे सारे नाराज लोक एकत्र येतील आणि भाजपचा विजय सुकर होईल यासाठी गिरीश बापटांचे येणे हे भारतीय जनता पार्टीसाठी संजीवनी बनू शकते. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या. 'पुण्याची ताकद गिरीश बापट' या घोषणेने परिसर दुमदुमून गेला.कार्यकर्त्यांमध्येसुद्धा एक उत्साह निर्माण झालेला दिसला.

राष्ट्रवादीची टीका : पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजपाकडून खासदार गिरीश बापट यांना प्रचारात सहभागी करून घेतले आहे. त्यावर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून टीका करण्यात येत आहे. पुणे आणि पुण्यातली भाजपा याचे समीकरण म्हणजे गिरीश बापट आहेत. गिरीश बापट हे पुण्यातील भाजपाचे गेले 25 वर्ष नेतृत्व करत आहेत. परंतु आजारपणामुळे ते गेल्या काही दिवसांपासून या सगळ्यापासून दूर आहेत. सध्या त्यांची प्रकृती ही तेवढीशी चांगली नसल्यामुळे ते व्हिलचेअरवरच असतात. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याची सूचना केलेली आहे. त्यामुळे ते कार्यकर्त्यांनाही भेटत नाहीत .परंतु कसबा पोट निवडणुकीमध्ये भाजपाने कुठलीही चूक किंवा संधी आपल्याकडून जाऊ नये यासाठी ,आज खासदार गिरीश बापट यांना केसरी वाड्यामध्ये काही मोजक्याच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विनंती केली. गिरीश बापट यांनीसुद्धा ती विनंती मान्य करून अवघे अडीच ते तीन मिनिटे मार्गदर्शनही केले.

काँग्रेसची टीका - या सगळ्यांमध्ये आता काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी टीका केली असून. भाजपाला माणसांपेक्षा आणि त्यांच्या आजारापेक्षा ही निवडणूक महत्त्वाची आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा काही करू शकते. अगदी दोन दिवसांपूर्वीच खासदार गिरीश बापट यांनी वर्तमानपत्रातून मी आजारी आहे. माझ्या प्रकृती अस्वस्थामुळे मी येऊ शकत नाही, असे जाहीर केले होते, असे मोहन जोशी म्हणाले.

हेही वाचा : Hearing On Shiv Sena: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष! सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला

Last Updated : Feb 16, 2023, 10:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.