ETV Bharat / state

MP Girish Bapat Entered Kasaba : खासदार गिरीश बापट कसब्यात दाखल, कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य; भेटण्यासाठी मोठी गर्दी - पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यावर उपचार

गेल्या काही दिवसांपासून पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या तब्बेतीत सुधारणा झाल्यानंतर बापटांना डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळताच गिरीश बापट यांनी कसब्यातील कार्यलय गाठले. गिरीश बापट कार्यलयात आले आहेत हे कळताच कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली.

MP Girish Bapat Entered Kasaba, Enthusiasm Among Activists A Large Crowd to Meet
खासदार गिरीश बापट कसब्यात दाखल, कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य; भेटण्यासाठी मोठी गर्दी
author img

By

Published : Jan 18, 2023, 8:30 PM IST

पुणे : खासदार बापट हे गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना श्वसनाचा त्रास आहे. ते आजारी असल्यामुळे सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळींनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या होत्या. गेल्याच महिन्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीदेखील रुग्णालयात जाऊन बापट यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि महिन्याभरात संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे संसदेत भेटू, अशा शब्दांत पवार यांनी बापट यांना धीर दिला होता.

अचानक बापट कार्यालयात दिसल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंद : दरम्यान, खासदार बापट हे आजारी पडल्यानंतर काल पहिल्यांदाच सुमारे दीड महिन्यानंतर कसबा कार्यालयात आले होते. ते कार्यालयात येणार याची कुणालाच कल्पना नव्हती. ती नेहमीप्रमाणे जसे कार्यालयात यायचे आणि ज्या ठिकाणी बसायचे तिथे येऊन बसले होते. दरम्यान, अचानक बापट कार्यालयात दिसल्याने कार्यकर्त्यांना मोठा आनंद झाला. ही बातमी लगेच कार्यकर्त्यांपर्यंत पोहचली आणि कार्यकर्त्यांनी जमायला सुरुवात केली.

MP Girish Bapat Entered Kasaba, Enthusiasm Among Activists A Large Crowd to Meet
खासदार गिरीश बापट कसब्यात दाखल, कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य; भेटण्यासाठी मोठी गर्दी

तब्येतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज : त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे ते आपल्या घरीच विश्रांती घेत आहेत. मात्र, अजूनही ऑक्सिजनची श्वसननलिका त्यांना लावलेली आहे, असे असूनही बापट यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी कसबा कार्यालय गाठले आणि भेटलेल्या कार्यकर्त्यांची नेहमीप्रमाणे विचारपूस केली. यामुळे कार्यकर्ते कमालीचे आनंदी झाले होते.

पुण्याची ताकद, गिरीश बापट : 'पुण्याची ताकद, गिरीश बापट' या घोषणेने परिसर अक्षरशः दणाणून निघाला होता. गिरीश बापट यांची पुणे भाजपात असलेली ताकद सर्वश्रुत आहे. अशात दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यात रिक्त झालेल्या जागेवर भाजपमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. अशात गिरीश बापट आजारी असतानादेखील पुन्हा सक्रिय झाल्याने कसब्यात पुन्हा एकदा गिरीश बापट यांचीच एकहाती सत्ता असल्याचे स्पष्ट होत आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघात 27 फेब्रुवारीला पोटनिवडणूक : मुक्ता टिळक यांच्या निधनांनंतर कसबा विधानसभा मतदारसंघात येत्या 27 फेब्रुवारीला पोटनिवडणूक होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर गिरीश बापट यांचे अशापद्धतीने पुन्हा सक्रिय होणे म्हणजे कसबा विधानसभा मतदारसंघात अजूनही गिरीश बापट यांचाच शब्द अंतिम असेल, असेच सुचवू पाहत आहेत. खासदार गिरीश बापट आजारी असल्यापासून भाजपाच्या अंतर्गत राजकीय गटातटांमध्ये भाजपात पोकळी निर्माण झाल्याचे चित्र स्पष्ट होत होते.

बापट सक्रिय नसल्याने राष्ट्रवादीला होणार याचा फायदा : बापट सक्रिय नसल्यामुळे कसबा मतदारसंघतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये पोकळी निर्माण झाली होती. याचाच फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपली मोर्चे बांधणी करून घेत होती कारण भारतीय जनता पार्टीला सक्षम नेतृत्व कार्यरत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी उदासीनता होती. त्यातच मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने पुण्याच्या पेठांमधील भागांमध्ये भाजपाच्या वर्चस्वाला नेता कोण? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर आता बापट पुन्हा सक्रिय झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.