ETV Bharat / state

खासदार अमोल कोल्हेंची अशीही एक सभा!

सभेला उपस्थित जनतेशी संवाद साधाण्यासाठी अमोल कोल्हेंनी चक्क मोबाईलचा आधार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचे कारण देत उड्डाणाची परवानगी नाकारल्यामुळे ऐनवेळी कोल्हे पिंपरी-चिंचवडमध्ये सभेला पोहचू शकले नाहीत. मोदींच्या सभेमुळे उड्डाणाची परवानगी नाकारणे म्हणजे अघोषीत आणीबाणी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

खासदार अमोल कोल्हे
author img

By

Published : Oct 18, 2019, 5:17 AM IST

पुणे - राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या तिन नियोजित सभा पिंपरी-चिंचवडमध्ये होणार होत्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचे कारण देत उड्डाणाची परवानगी नाकारल्यामुळे ऐनवेळी कोल्हे या सभांना पोहचू शकले नाहीत. परंतु त्यांनी हार न मानता सभेला उपस्थित जनतेशी संवाद साधाण्यासाठी चक्क मोबाईलचा आधार घेतला.

खासदार अमोल कोल्हे

थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र तो साध्य झाला नाही. अमोल कोल्हे यांनी अखेर मोबाईलवरून पिंपरी-चिंचवडमधील जनतेशी संवाद साधला. त्यांच्या उपस्थितीत सभा व्हावी यासाठी अमोल कोल्हे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. औरंगाबाद येथे जाऊन चार्टड विमानाने पुणे येथे येण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र, तेथे परवानगी नाकारण्यात आली, असं खुद्द अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे. अखेर पुण्याच्या दिशेने येत असताना चांदवड नाशिक येथे रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून समोर श्रोता नसताना त्यांनी पिंपरी-चिंचवड मधील जनतेशी समवाद साधला. यावेळी त्यांनी सहा ते सात मिनिटे भाषण केले.

हेही वाचा - 'मित्रपक्षांचा भाजपने वापर केला, आता फेकून द्यायचे काम केले सुरू'

राष्ट्रवादीच्या पुरस्कृत आणि अधिकृत उमेदवारांना विजयी करावे जेणेकरून विजयी सभेत आपल्याला हजर राहता येईल, असे आवाहन कोल्हे यांनी यावेळी केले. मोदींच्या सभेमुळे उड्डाणाची परवानगी नाकारणे म्हणजे अघोषीत आणीबाणी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Intro:mh_pun_02_amol_kolhe_avb_mhc10002Body:mh_pun_02_amol_kolhe_avb_mhc10002

Anchor:- राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नियोजित तीन सभा पिंपरी-चिंचवडमध्ये होत्या, मात्र त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रोटोकॉल च कारण देत हेलिकॉप्टर च उड्डाण करायला परवानगी नाकारत ऐनवेळी सभा रद्द करण्याची नामुष्की कोल्हे यांच्यावर ओढवली. परंतु, त्यांनी हार मानली नाही उपस्थित जनतेशी संवाद साधायचा अस ठरवलं. स्क्रिनिंग द्वारे थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो डिजिटल इंडिया असताना साध्य झाला नाही. अखेर मोबाईलवरून अमोल कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवडमधील जनतेशी संवाद साधला. जनतेच्या उपस्थितीत सभा व्हावी यासाठी अमोल कोल्हे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. औरंगाबाद येथे जाऊन चार्टड विमानाने पुणे येथे येण्यासाठी प्रयत्न केला, मात्र तेथे परवानगी नाकारण्यात आली. अस स्वतः अमोल कोल्हे यांनी सांगितलं आहे. अखेर पुण्याच्या दिशेने येत असताना चांदवड नाशिक येथे रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून समोर श्रोता नसताना फोनद्वारे पिंपरी-चिंचवडमधील जनतेशी अमोल कोल्हे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी सहा ते सात मिनिट भाषण केले. अस या अगोदर कधीही झालेलं पाहायला मिळाले नाही. जनता समोर नसताना अमोल कोल्हे यांनी भाषण केले. राष्ट्रवादीच्या पुरस्कृत आणि अधिकृत उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावं जेणेकरून विजयी सभेत येईल असं अमोल कोल्हे यांनी आश्वस्त केलं.

भाषण करतानाचा साऊंड बाईट:- अमोल कोल्हे- खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.