ETV Bharat / state

Mother Murdered 2 Children : रागाच्या भरात आईने केली दोन चिमुकल्यांची हत्या; मृतदेह टाकले झुडपात

आईनेच आपल्या पोटच्या दोन चिमुकल्यांची दोरीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या चिमुकल्यांची हत्या केल्यानंतर आई घरातून निघून गेली. आरोपी आईला पौड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

pune police
pune police
author img

By

Published : Jan 8, 2022, 1:12 PM IST

पुणे - पुण्याच्या मुळशी तालुक्यातील शिरवली येथे आई-मुलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आईनेच आपल्या पोटच्या दोन चिमुकल्यांची दोरीने गळा आवळून हत्या ( Mother Murdered 2 Children ) केल्याची धक्कादायक घटना घडली. या चिमुकल्यांची हत्या केल्यानंतर आई घरातून निघून गेली. आरोपी आईला पौड पोलिसांनी ( Paud Police Station)) ताब्यात घेतले आहे.

मृतदेह टाकले झुडपात -

आरोपी आई पूना संजय सोलंकी (वय 24) हिच्या पतीने दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना पाच जानेवारीला दुपारी घडली आहे. आरोपीने रागाच्या भरात मोठी मुलगी चंदा सोलंकी (वय 3 वर्षे 6 महिने) आणि मुलगा आनंद सोलंकी (वय 2 वर्षे) या दोघांची दोरीने गळा आवळून हत्या ( Mother Killed Children ) केली. ती इतक्यावरच थांबली नाही दोघांचेही मृतदेह उंच वाढलेल्या झुडपात टाकून निघून गेली, अशी तक्रारीत नमूद केले आहे.

लोणावळ्यातून आरोपी ताब्यात -

दरम्यान या प्रकाराबाबत पौड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह झुडपात टाकून आरोपीने पळ काढला होता. त्यानंतर पोलिसांनी शोध घेणे सुरू केले. अखेर लोणावळा येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. याबाबतचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पौड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.