ETV Bharat / state

लसीअभावी पुण्यातील बहुतांश लसीकरण केंद्र बंद; नागरिकांना मनस्ताप

author img

By

Published : May 1, 2021, 8:10 PM IST

आज पुण्यातील बहुतांश लसीकरण केंद्र पुरेशा लसींच्यासाठ्या अभावी बंद होती. फक्त पुणे महानगरपालिकेचे कमला नेहरू रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालय या दोन रुग्णालयातच आज लसीकरण सुरू होते.

vaccination centers was closed in pune
लसीअभावी पुण्यातील बहुतांश लसीकरण केंद्र बंद; नागरिकांना मनस्ताप

पुणे - 18 वर्षावरील प्रत्येक नागरिकांसाठी आजपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. परंतु असे असले तरी पुण्यातील बहुतांश लसीकरण केंद्र पुरेशा लसींच्यासाठ्या अभावी बंद होती. फक्त पुणे महानगरपालिकेचे कमला नेहरू रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालय या दोन रुग्णालयातच आज लसीकरण सुरू होते. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत लसीकरण सुरू होते.

प्रतिक्रिया

लसीकरण केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांशी वाद -

लसीचा या तुटवड्याचा मोठा फटका सध्या पुणे शहराला बसला आहे. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी त्याचा प्रत्ययदेखील आला आहे. कमला नेहरू रुग्णालयात आज सकाळपासून अनेक नागरीक लस घेण्यासाठी दाखल झाले होते. परंतु आज केवळ नोंदणी झालेल्या 350 नागरिकांनाच लस देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. तरी या सर्व नागरिकांचा हिरमोड झाला. काही नागरिकांनी तर थेट लसीकरण केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांशी वादही घातला.

यापुढेही नागरिकांना त्रास होण्याची शक्यता -

पुणे महानगरपालिकेने शुक्रवारीच एक पत्रक काढत 18 ते 44 वर्षाच्या व्यक्तीचेच लसीकरण होणार असल्याचे जाहीर केले होते. शिवाय फक्त दोन केंद्रावरच लसीकरण होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. परंतु ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे हा सर्व गोंधळ उडाला आणि मोठ्या संख्येने नागरिक या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी हजर झाले. खासगी रुग्णालयातदेखील लस मिळत नसल्यामुळे लस घेऊ इच्छिणाऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यापूर्वी महानगरपालिकेकडून खासगी रुग्णालयांना लस दिली जात होती. परंतु आजपासून खाजगी रुग्णालयांनादेखील लस देणे बंद केल्यामुळे नागरिकांना यापुढेही मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

हेही वाचा - 'लस सुरूवातीला परदेशात देण्याची काहीच गरज नव्हती'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.