पुणे - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी येथील सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली.
ट्विटमध्ये भारती पवार काय म्हणाल्या?
'आज मी लसींच्या प्रमुख उत्पादकांपैकी एक असलेल्या आदर पुनावाला यांच्या नेतृत्त्वातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट दिली. विशेषत: जेव्हा आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या नागरिकांचे 100 कोटी लसीकरण साध्य करण्याच्या मार्गावर आहोत. यावेळी भारतातील कोविड लसीकरण मोहिमेत महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल माझी कृतज्ञता व्यक्त केली', असे ट्विट त्यांनी केले.

हेही वाचा - Corona Update : दिवसभरात 1,638 नवे रुग्ण तर २ हजार ७९१ रुग्णांची करोनावर मात; रिकव्हरी रेट ९७.४२ टक्के