पुणे - विभागातील कोरोबाधितांच्या संख्येत गुरुवारी 873 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. यात पुणे जिल्ह्यातील 766, साताऱ्यातील 4, सोलापूर जिल्ह्यातील 86, सांगलीतील 15 तर कोल्हापूर जिल्ह्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे. पुणे विभागातील आतापर्यंतची कोरोनाबाधितांची संख्या 17 हजार 342 इतकी आहे. यातील 10 हजार 756 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, सध्या 5 हजार 828 जणांवर उपचार सुरु आहेत.
पुणे विभागात आतापर्यंत 758 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 296 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.02 टक्के आहे. तर, मृत्यूचे प्रमाण 4.37 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील बाधितांचा आतापर्यंतचा आकडा 13 हजार 685 असून 8 हजार 351 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, सध्या 4 हजार 794 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याशिवाय 540 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 275 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 61.02 टक्के आहे. तर, मृत्यूचे प्रमाण 3.95 टक्के इतके आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 770 असून 571 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 161 आहे. तर, एकूण 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 897 कोरोनाबाधित रुग्ण असून 1 हजार 48 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 685 आहे. एकूण 164 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यात 262 कोरोनाबाधित रुग्ण असून 130 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 124 आहे. एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 728 कोरोनाबाधित रुग्ण असून 656 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सांगली रुग्ण संख्या 64 आहे. एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत विभागामध्ये एकूण 1 लाख 27 हजार 828 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 1 लाख 29 हजार 927 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 901 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 6 हजार 329 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 17 हजार 342 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.