ETV Bharat / state

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या बनावट फेसबुकवरून युजर्सकडे पैशांची मागणी - कृष्ण प्रकाश बनावट फेसबुक अकाऊंट

प्रसिद्ध व्यक्तींच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून पैसे मागण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, आता थेट पोलीस आयुक्तांच्या नावानेच पैसे मागितले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Krishna Prakash
कृष्ण प्रकाश
author img

By

Published : Oct 22, 2020, 4:04 PM IST

Updated : Oct 22, 2020, 4:17 PM IST

पुणे : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावे असणाऱ्या बनावट फेसबुक अकाऊंटवरून एका व्यक्तीला पैशांची मागणी झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी स्वतः पोलीस आयुक्तांनी ऑफिशियल फेसबुक पेजवर पोस्ट करत माहिती दिली. अशा बनावट खात्यांपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले. मात्र, अवघ्या तासाभरातच त्यांनी ही पोस्ट डिलीट केली.

फेसबुक आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात आता पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाचा वापर करूनही पैसे मागितले जात असल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी त्यांच्या अधिकृत फेसबुकवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, माझ्या नावाचे बनावट फेसबुक खाते असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर काही बनावट अकाऊंट आहेत. त्यातून आर्थिक फसवणूक होऊ शकते. संबंधित बनावट खात्याप्रकरणी त्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल. मात्र, नागरिकांनी बनावट खात्यांपासून सावध राहा, असे त्यांनी म्हटले आहे.

ती पोस्ट पोलीस आयुक्तांनी केली डिलीट -

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी त्यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट असल्याची पोस्ट केली. त्यात त्यांच्या नावे युजर्सकडून पैसे मागितल्याचा स्क्रीनशॉटही शेअर केला. मात्र, ती पोस्ट पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी अवघ्या तासाभरातच डिलीट केली. आयुक्तांनी ही पोस्ट का डिलीट केली, हे समजू शकले नाही.

Last Updated : Oct 22, 2020, 4:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.