ETV Bharat / state

Mohsin Shaikh Murder Case : मोहसीन शेख खून प्रकरणात काँग्रेस, राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक अडकवले; धनंजय देसाईंचा आरोप - देशातील पहिली मॉब लिंचिंग

मोहसीन शेख मर्डर प्रकरणांमध्ये मला जाणून बुजून तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारने अडकवलं. त्यांना हवे असलेले आरोपी तयार केले. खऱ्या आरोपीला सोडून दिले असा आरोप हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांनी केला आहे.

Dhananjay Desai
Dhananjay Desai
author img

By

Published : Jan 27, 2023, 10:28 PM IST

Updated : Jan 27, 2023, 10:39 PM IST

धनंजय देसाईं

पुणे : न्यायालयाने आमची निर्दोष मुक्तता करून आमची बाजू ऐकून घेतली. न्यायलासमोर एकाही साक्षीदाराला सांगता आले नाही की आम्ही त्या दिवशी तिथे होतो. त्यामुळे हा तत्कालीन सरकारचा डाव होता असे देखील ते म्हणाले. 2014 मध्ये फेसबुकवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल घाणेरडे विटंबन झाले. म्हणून महाराष्ट्रभर हिंदुत्व संघटनांनी त्या विरोधात आंदोलन केली. त्या आंदोलनात हडपसरमध्ये मोहसीन शेख नावाच्या तरुणाची हत्या झाली. त्यावेळच्या आघाडी सरकारने त्यांना सोयीचे असलेले आरोपी केल्याचा आरोप देसाई यांनी केला.

आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न : केंद्रामध्ये केंद्रीय राजसत्ता ढासळली होती. सत्ता गेल्याने त्यांनी आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला. या मागे मुस्लिमांची मते काँग्रेस राष्ट्रवादीला आपल्याकडे वळवायचे होते. जिहादी मतदारांचे एकत्रिकरण कसे करता येइल यासाठी तेव्हाच्या सरकाने आखलेला हा डाव होता असे देसाई म्हणाले. तत्कालीन सरकारने खरे आरोपी सोडून आम्हाला यात अडकवण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांनी केला आहे.

तत्कालीन सरकारचा कट : 2014 च्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत आमच्या सहभाग होता. त्यामुळे आम्हाला जाणीवपूर्वक या कटत अडकविण्यात आलं. न्यायालयाने आम्हाला आता निर्दोष मुक्त केलेले आहे. या सरकारमुळे आम्हाला तुरुंगात जावे लागले. आमची बदनामी करण्यात आली, साधू संतांची हत्या झाल्यासारखे आमच्या कुटुंबाची बदनामी करण्यात आली. परंतु शेवटी न्याय व्यवस्थेने आम्हाला न्याय दिल्याची भावना हिंदू राष्ट्र सेनचे अध्यक्ष धनंजय देसाई यांनी केली. त्यांनी तत्कालीन सरकारवर म्हणजेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार नेतृत्वाखालील सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

वीस जणांवर मोहसीनच्या हत्येचा आरोप : 02 जून 2014 ला पुण्यातील हडपसर भागात मोहसीन शेख या आयटी इंजिनीयरची हत्या करण्यात आली होती. हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याच्यासह या संघटनेच्या वीस जणांवर मोहसीनच्या हत्येचा आरोप होता. त्यावेळी फेसबुक आणि सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह्य पोस्ट टाकण्यात आल्यानं तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी धंनजय देसाईने त्याच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांसमोर चिथावणीखोर भाषण दिल्याने त्याच्या कार्यकर्त्यांनी मोहसीनची हत्या केल्याचा आरोप होता. 2014 साली घडलेल्या मोहसीन शेख हत्या प्रकरणातील सर्व 20 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हिंदु राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई आणि अन्य 20 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्दोष सुट्टीनंतर धनंजय देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन या आरोप केले आहेत.

देशातील पहिली मॉब लिंचिंग : ममोहसिन शेख प्रकरणांचा दबावांमध्ये निकाल लागण्यात आल्याचा आरोप आता मुस्लिम सामाजिक संघटना करत आहे. ममोहसिन शेखच्या घरी कोणी नसल्यामुळे पुढच्या लढाईसाठी त्यांना कायदेशीर मदत करु असे अंजुम इनामदार यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर ही देशातील पहिली मॉब लिंचिंग आहे. देशातील पहिली विकेट घेतली असे हिंदू संघटनाचे म्हणणे होते असा आरोप त्यांनी केला. सुनावणी वेळे अनेक हिंदू राष्ट्राचे पदाधिकारी त्या ठिकाणी येत होते. त्यामुळे दबावापोटी दिलेला हा दुर्दैवी निर्णय असल्यास अंजुम इनामदार यांनी म्हटलेले आहे. मोहसीन शेखच्या कुटुंबियांना पुढची लढाई लढण्यासाठी मदत आम्ही सामाजिक संघटना म्हणून करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Threat To Ashish Shelar : आशिष शेलार यांना जीवे मारुन समुद्रात फेकण्याची धमकी, कार्यालयात आले निनावी पत्र

Last Updated : Jan 27, 2023, 10:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.