ETV Bharat / state

Ramazan Month : रमजान महिन्यास गुरुवारपासून प्रारंभ; मुंबईतील मोहम्मद अली रोड सजला - रमजान

रमजानच्या पवित्र महिन्याला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या निमित्ताने मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील मोहम्मद अली रोड विविध दुकानांनी सजू लागला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदारांनी ही नवनवीन शक्कल लढवल्या आहेत. यंदा मोठा उत्साहात रमजान महिना साजरा केला जाईल अशा प्रतिक्रिया दुकानदार आणि ग्राहकांनी व्यक्त केल्या आहेत.

Ramazan Eid
रमजान ईद
author img

By

Published : Mar 22, 2023, 8:19 PM IST

Updated : Mar 24, 2023, 8:55 AM IST

मुंबईतील मोहम्मद अली रोड परिसरातील प्रतिनिधींनी घेतला आढावा

मुंबई : मुस्लिम धर्मात पलित्र मानला जाणारा ईद महिन्यास प्रारंभ होत आहे. या महिन्याला मुस्लिम धर्मात अनन्यसाधारण महत्व असते. रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांकडून निरंकारी उपवास केले जातात. दरम्यान, मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील मोहम्मद अली रोड हा ओळखला जातो त्याच्या गर्दीसाठी. मात्र, उद्यापासून सुरू होणाऱ्या रमजाननिमित्त हा रस्ता अधिकच सजू लागला आहे. विविध प्रकारच्या खजूर विविध प्रकारच्या बर्फी पेढे मिठाया तसेच विविध खीरींनी दुकाने ओसंडून वाहत आहेत. मीनारामजीतला लावून असलेल्या या बाजारात भर दुपारी ग्राहकांनी गर्दी केली होती.

विशेष खाद्यपदार्थ : संध्याकाळनंतर तर या ठिकाणी पाय ठेवायला जागा नसते असे दुकानदार सांगतात. इथल्या एका हॉटेल व्यावसायिकाने यंदा रमजान साठी विशेष वीस मेनू तयार केले आहेत. तर इफ्तारीनंतर सुरू होणाऱ्या जेवणासाठी त्यांनी 35 प्रकारचे वेगवेगळे पदार्थ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याकडे पलेटर, संदल, चिकन टिक्की, चिकन रेशमी बरा, चिकन तंदुरी, रुमाली रोटी, याशिवाय अनेक नवनवीन पदार्थ आपण तयार करत असल्याचे अब्दुल रहमान सांगतात.

ग्राहकांसाठी खरेदीचा सुवर्णकाळ : मुस्लिम बांधव रमजान महिन्याला उत्सव मानतात. या महिन्या दरम्यान उत्सव सुरू असल्यामुळे या परिसरात नवनवीन वस्तूंची रेलचेल असते. विविध फळांपासून खजूर खारीक वेगवेगळ्या मिठाया तसेच चिकन आणि मटनचे अनेक प्रकार या ठिकाणी ग्राहकांना पाहायला मिळतात. त्याचा स्वाद चाखता येतो. त्यामुळे आम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत या गल्लीत फिरत असतो. वेगवेगळ्या पदार्थांची चव चाकत असतो, अशी प्रतिक्रिया नटरादिल मिर्झा यांनी दिली.

सर्व धर्मियांचा उत्सव काळात वावर : पवित्र रमजाननिमित्त या ठिकाणी मोठा बाजार भरत असल्याने केवळ मुस्लिम धर्मीय नव्हे तर सर्व धर्मातील लोक या उत्सवात सहभागी होतात. या ठिकाणी येऊन खरेदी करणे आणि अनोख्या पदार्थांचा आस्वाद लुटणे हे सर्व धर्मीय नागरिकांना आवडत असल्याने मोठ्या प्रमाणात सर्व धर्मीयांची गर्दी होत असल्याची माहिती अब्दुल रहमान यांनी दिली.

हेही वाचा : Ramadan Month Special : रमजान म्हणजे काय अन् रमजान महिन्यात उपवास का केला जातो, वाचा सविस्तर

Last Updated : Mar 24, 2023, 8:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.