ETV Bharat / state

मोदी चांगले आहेत म्हणून नाही तर लागू शकते राष्ट्रपती राजवट - चंद्रकांत पाटील

मोदी चांगले आहेत, अन्यथा तुम्ही जे करता तो राज्यपालांचा अवमान असून त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू शकते, असा घणाघात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केला आहे.

chandrakant patil latest news
मोदी चांगले आहेत म्हणून नाही तर लागू शकते राष्ट्रपती राजवट - चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Jul 1, 2021, 9:24 PM IST

पुणे - महाविकास आघाडी सरकारला हे माहिती नाही कि इंदिरा गांधींच्या काळात 18 वेळेला राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती. मोदी असे नाही, अन्यथा तुम्ही जे करता तो राज्यपालांचा अवमान असून त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू शकते, असा घणाघात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केला आहे. आज पुण्यात पत्रकारांशी ते बोलत होते.

प्रतिक्रिया

'वरिष्ठांनी याचा विचार करावा' -

आज भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यागाडीवर झालेल्या हल्यासंदर्भातही त्यांनी प्रतिक्रिया दिली. 'महाराष्ट्राच्या राजकारणात अशी स्थिती कधीच नव्हती. त्यामुळे शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, दिवाकर रावते या सारख्या वरिष्ठांनी या गोष्टींचा विचार करावा, नाहीतर हे प्रकरण कुठे जाईल माहित नाही', असे त्यांनी म्हटले.

'म्हणजे एक दिवसाचे पावसाळी अधिवेशन' -

विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवरूनही त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 48 तास आधी नोटीस द्यावी लागते. त्याचे मतदान सभागृहात घ्यावे लागते. जर उद्या सरकारने यासंदर्भात नोटीस दिली. तर दोन दिवसातील एक दिवस मतदान करण्यात निघून जाईल त्यामुळे पावसाळी अधिवेशनाचे एकच दिवसाचे होईल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

'उद्धव ठाकरे खुपच साधे, अजित पवार त्रास देत आहे' -

अजित पवार हे आमच्या आमदारांना निधी न देणे, ज्यांचे साखर कारखाने आहे त्यांना त्रास देणे, आमच्या कार्यकर्त्यांची साखर कारखान्यांची कर्ज रद्द करणे, असे प्रकार करत आहेत. जर अजित पवार अंगावर घेत असेल आणि उद्धव ठाकरे हे मागे बसून करत असेल तर उद्धव ठाकरे हे ग्रेट राजकारणी आहेत. पण उद्धव ठाकरे हे खूपच साधे आणि सरळ आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - नागपुरातील वकील परमार यांची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात 'ईडी'कडे तक्रार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.