ETV Bharat / state

Sidhu Moose Wala Murder: सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई - पुणे ग्रामीण पोलीस

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात ( Sidhu Moose Wala Murder ) अटक करण्यात आलेल्या आरोपींवर मोक्कानंतर्गत कारवाई ( Mocca action against criminals ) करण्यात आली आहे. संतोष सुनील जाधव, जीवनसिंग दर्शनसिंग नहार, श्रीराम रमेश थोरात, जयेश रतीलाल बहिरट, जिशान इलाहीबक्श मुंढे, गणेश तारु, वैभव उर्फ भोला शांताराम तिकटारे, रोहित विठ्ठल तिकटारे, सचिन बबन तिकटारे-यांच्यासह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

Sidhu Moose Wala Murder
आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई
author img

By

Published : Jul 6, 2022, 9:22 AM IST

Updated : Jul 6, 2022, 10:32 AM IST

पुणे - पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात ( Sidhu Moose Wala Murder ) अटक करण्यात आलेला आरोपी संतोष जाधववर मोक्कानंतर्गत कारवाई ( Mocca action against criminals ) करण्यात आली आहे. यात संतोष जाधवसह ( santosh jadhav in Sidhu Moose Wala Murder ) त्याच्या साथीदारांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी ( Pune Rural Police ) मोक्कानंतर्गत कारवाई केली आहे. संतोष जाधव हा मुळचा पुण्यातील मंचर येथील आहे.

आरोपींविरोधात विरोधात मोक्का कारवाई - मोक्कानंतर्गत कारवाई करण्यात आलेल्यामध्ये संतोष सुनील जाधव, जीवनसिंग दर्शनसिंग नहार, श्रीराम रमेश थोरात , जयेश रतीलाल बहिरट, जिशान इलाहीबक्श मुंढे, गणेश तारु, वैभव उर्फ भोला शांताराम तिकटारे, रोहित विठ्ठल तिकटारे, सचिन बबन तिकटारे-यांच्यासह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या आरोपींविरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. संतोष जाधव विरोधात ही दुसरी मोक्का कारवाई आहे.

गुन्हेगारीत तरुणांचा वाढता सहभाग - गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागात गुन्हेगारी वाढली असून अनेक तरुणांचा सहभाग हा वाढत आहे. संतोष जाधव आणि त्याच्या साथीदारांनी नारायणगाव मधील एका व्यवसायिकाकडे खंडणी मागितली होती. वारंवार त्याच्याकडे संतोष जाधव गँग मधील तरुण हे खंडणी मागत होते. पण जेव्हा संतोष जाधव याला पुणे ग्रामीण पोलिसांनी गुजरात येथून अटक केली. तेव्हा या व्यवसायिकांने यासंदर्भात पुणे ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्यावरून पोलिसांनी आरोपींना अटक देखील केली होती. यासर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण? - मानसा गावात दोन हल्लेखोरांनी सिद्धू मूसेवाला यांच्या वाहनावर एके- ९४ मधून ३० राऊंड गोळीबार केला. कारमध्ये सिद्धूसोबत त्यांचे दोन साथीदारही होते. या अपघातात एका साथीदाराचा मृत्यू झाला आहे, तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या संपूर्ण घटनेच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने सिद्धू मूसेवाला यांची सुरक्षा कमी केली होती.

हत्येच्या दिवशी आपण गुजरातमध्ये - सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येच्या दिवशी आपण गुजरातमध्ये होतो, असे संतोष जाधव याने चौकशीत सांगित होते. त्यामुळे, संतोष जाधवच्या वक्तव्याची चौकशी करण्यासाठी पुण्याचे पथक गुजरात आणि मध्य प्रदेश येथे गेले होते. त्याव्यतिरिक्त सौरभ महाकाळ याने मुसेवाला हत्या प्रकारणात सहभागी नसल्याचे सांगितले होते. तर, दिल्ली आणि पंजाब पोलिसांनी या 8 शूटर्सचे फोटो जारी केले होते आणि संतोष हा या हत्याकांडाचा मुख्य शूटर असल्याचा दावा केला होता.

पोलिसांनी 'या' गोष्टीही घेतल्या ताब्यात - पोलिसांच्या स्पेशल सेलने सिद्धू मुसेवाला हत्याप्रकणात सहभागी असलेल्या अंकित आणि सचिनला दिल्लीतील काश्मीरी गेट बस स्थानकाजवळ 3 जुलै ( रविवार ) रोजी अटक केली. या आरोपींजवळ दोन पिस्तुल 19 काडतुसे आणि 3 पंजाब पोलिसांचे गणवेश जप्त केले आहे.

अंकित आणि सचिन 'या' राज्यातील - अंकित आणि सचिन लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार गँगशी संबंधित आहेत. शार्प शूटर अंकित हा सोनीपतचा राहणारा आहे. अंकितवर राजस्थानमध्ये हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 2 गुन्हे दाखल आहेत. तसेच, सचिन भिवानी वर सुद्धा सिद्धू मुसेवाला प्रकरणातील शूटर्सला लपवणे आणि मदत करण्याचा आरोप आहे. सचिन हा बिश्नोई आणि गोल्डी गँगचे राजस्थानातील काम करत आहे. त्याच्यावरही राजस्थानमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा - Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, 'बंडखोरांना पर्याय शोधण्याचे आदेश', लवकरच महाराष्ट्र दौरा

Last Updated : Jul 6, 2022, 10:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.