ETV Bharat / state

विशेष : 'मूर्ती आमची, देणगी तुमची'; मनसेतर्फे सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येणार तब्बल 4500 गणेशमूर्ती

author img

By

Published : Sep 8, 2021, 5:57 PM IST

Updated : Sep 8, 2021, 7:29 PM IST

नागरिकांना घरी गणरायाची मूर्ती बसवण्यात यावी यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. या उपक्रमात तब्बल 4500 मुर्ती नागरिकांना देण्यात येणार आहे. नागरिकांसाठी या ठिकाणी एक कळस ठेवण्यात आले आहे. त्याद्वारे त्यांनी वाटेल ती रक्कम या कळसात टाकून बाप्पाची मुर्ती बुक करायची आहे.

mns will distribute to 4500 ganeshmurti to common people pune
मनसेतर्फे सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येणार तब्बल 4500 गणेशमूर्ती

पुणे - कोरोनामुळे एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जात असताना दुसरीकडे मात्र अनेक संस्था संघटना मदतीच हातदेखील देत आहेत. मागच्यावर्षी लॉकडाऊन असताना गणेशोत्सवाच्या काळात काही नागरिकांना घरी गणपती बप्पाची मूर्ती बसवता आली नाही. यंदाही कोरोनाचा संकट त्यात आलेले आर्थिक संकटामुळे नागरिकांना घरी मूर्ती बसवण्यात अडचण येऊ नये म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने एक आगळीवेगळी संकल्पना राबविण्यात आली आहे. मनसे शहर संघटक प्रल्हाद गवळी यांच्यावतीने गणपती आमचा देणगी तुमची या उपक्रमात तब्बल 4500 गणरायाच्या मुर्ती सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येणार आहे.

याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतलेला आढावा

तब्बल 4500 मूर्ती नागरिकांना देण्यात येणार -

नागरिकांना घरी गणरायाची मूर्ती बसवण्यात यावी यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. या उपक्रमात तब्बल 4500 मुर्ती नागरिकांना देण्यात येणार आहे. नागरिकांसाठी या ठिकाणी एक कळस ठेवण्यात आले आहे. त्याद्वारे त्यांनी वाटेल ती रक्कम या कळसात टाकून बाप्पाची मुर्ती बुक करायची आहे. या कळसात जी रक्कम जमा होणार आहे ती रक्कम मनसे आपल्याकडे न ठेवता अनाथ मुलांच्या संस्थेला मदत करणार आहे, अशी माहिती यावेळी शहर संघटक प्रल्हाद गवळी यांनी दिली.

हेही वाचा - 'माझ्या जीवाला धोका, प्लीज मला घेऊन चला'; रुपाली चाकणकरांनी टि्वट केला रामदास तडस यांच्या सुनेचा व्हिडिओ

सर्वसामान्य नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद -

अशा पद्धतीचा हा पहिल्यांदाच उपक्रम होत आहे. मागच्या वर्षी लॉकडाऊन आणि पैसे नसल्याने आम्ही बाप्पाची मूर्ती खरेदी केली नव्हती. मात्र, यंदा या उपक्रमाअंतर्गत अशा मूर्ती बुक केली आहे. खुप आनंद होत आहे, अशा भावनादेखील यावेळी सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केल्या. बाप्पाची मूर्ती आपल्या घरीही बसवण्यात यावी, यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दीदेखील केली होती. काहींनी 10 रुपये तर काहींनी 50 तर काहींनी 100 रु कळसात टाकून बाप्पाची मूर्ती बुक केली.

Last Updated : Sep 8, 2021, 7:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.