पुणे- शिरूर तालुक्यात शहरी व ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य झाल्याने अनेक रस्ते व राज्यमार्गांवर अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तरी देखील या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व संबधित ठेकेदार दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे, शिरूर येथे मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्या नेतृत्वाखाली सुशांत कुटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन खड्डे पाहाण्यासाठी भिंगाचा चष्मा भेट दिला.
अनेकवेळा तक्रार करूनही खड्ड्यांची दुरुस्ती केली जात नाही. उलट खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला. रस्त्यांवरील खड्डे वेळेत बुजवा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन केला आहे.
हेही वाचा- भोसरीमध्ये दोन वर्षीय चिमुकलीचा हौदात पडल्याने मृत्यू