शिरुर(पुणे)- कोरोना महामारीमुळे लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सतत होणारी इंधनाची दरवाढ त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलने शंभरी पार केली आहे. तरी कंपन्यांकडून दरवाढ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ झाली आहे.
पेट्रोल व डिझेल दर वाढ
आज पेट्रोल दरात २७ पैसे तर डिझेलमध्ये २३ पैसे वाढ करण्यात आली आहे. तर एक लिटर पेट्रोलचा भाव पहिल्यांदाच १०१ रुपयांवर गेला आहे. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरुर तालुक्याच्या वतीने गांधीगीरी मार्गाने निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळेस मनसेच्या कार्यकर्त्यांनी हातात निषेधाचे फ्लेक्स घेऊन व नागरिकांना पेढे वाटप करून हा निषेध व्यक्त केला आहे. या दरवाढीविरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपला केंद्र सरकार विरोधात रोष व्यक्त केला आहे.