पुणे : बेकायदेशीररित्या सुरू असलेली बाईक-टॅक्सी सेवा पुर्णपणे बंद करण्याच्या मागणीसाठी आज रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधीनी राज ठाकरे (MNS Presedent Raj Thackeray Promise) यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान राज ठाकरे यांना रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी रिक्षा चालकांना येणाऱ्या समस्यांबाबत सांगितले. आणि तेव्हा त्यांनी आपणच आमचे प्रश्न सोडवू शकता, असे सांगितले. यावर ठाकरे यांनी मी फक्त प्रश्न सोडवायलाच असतो, असे (representatives of rickshaw driver associations) सांगितले.
बेमूदत संप : पुणे शहरात बेकायदेशीररित्या सुरू असलेली बाईक-टॅक्सी सेवा पुर्णपणे बंद करण्याची मागणी रिक्षा संघटनांकडून करण्यात आली असून याविरोधात काल शहरातील 12 रिक्षा संघटनांनी बेमूदत संप पुकारला होता. शहरात दिवसभर काटेकोर पणे आणि शांततेत बंद पाळले गेले. तसेच, आरटीओ कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने आंदोलन केल गेले. अखेर प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे संप मागे घेण्यात आले आहे.
आंदोलन स्थगित : पुणे शहरात बेकायदेशीररित्या सुरू असलेली बाईक-टॅक्सी सेवा पुर्णपणे बंद करण्यासाठी काल शहरातील तब्बल 12 रिक्षा संघटनांकडून बंद पुकारण्यात आला. दिवसभर आंदोलन झाल्यावर प्रशासनाच्या वतीने आश्वासन दिल्यानंतर 10 डिसेंबर पर्यंत आंदोलन स्थगित करण्यात आले. या संघटनांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी यात लक्ष घालून आंदोलन सोडविण्यात येणार असल्याचं आश्वासन दिले (Raj Thackeray Promise to solve problem) आहे.
कंपनीविरोधात गुन्हा दाखल : शहरात अनधिकृतरित्या बाईक टॅक्सी (दुचाकी) सेवा दिली जाते. या सेवेला राज्य शासनाची परवनागी नाही. स्वस्त आणि जलद सेवा असल्यामुळे नागरिक बाईक-टॅक्सीला प्राधान्य देतात. पण, मोटार वाहन कायद्यानुसार खासगी वाहनांचा वापर करून प्रवासी सेवा देणे हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे अवैध बाईक-टॅक्सी बंद करण्याची मागणी रिक्षा संघटनांकडून केली जात आहे. महिलांसाठी ही सेवा सुरक्षीत नाही. तसेच, अशा बेकायदा बाईक टॅक्सीमुळे रिक्षाचालकाच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे संघटनांचे म्हणने आहे. याविरोधात रिक्षा संघटना एकवटल्यामुळे आरटीओकडून वेळोवेळी बाईक टॅक्सीवर कारवाई करण्यात आली. तसेच, संबंधीत कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, ही सेवा पुर्णपणे बंद व्हावी, यासाठी रिक्षा संघटनांकडून आंदोलन करण्यात आले (representatives of rickshaw driver pune) आहे.
राज ठाकरे यांच्यासोबत भेट : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत आमची भेट झाली. आणि या भेटीत आम्ही शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर दुचाकी टॅक्सीबाबत आम्ही आमची भूमिका मांडली. यावेळी राज ठाकरे यांनी स्वतः यात लक्ष घालतो, आणि तुम्हाला दहा तारखेनंतर आंदोलनाची वेळ येणार नाही, असे देखील आश्वासन यावेळी राज ठाकरे यांनी दिले आहे. असे यावेळी रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे.