पुणे- दौंड तालुक्यातील रेल्वेशी निगडित विविध समस्यांबाबत आमदार राहुल कुल यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते. या भेटीत दौंड तालुक्यातील रेल्वेशी निगडित समस्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती कुल यांनी दिली.
आमदार राहुल कुल यांनी पुढील मागण्या केल्या आहेत
१. दौंड तालुक्यातील रस्त्यांचा 'सुवर्ण चतुर्भुज' मार्गामध्ये (Golden Quadrilateral and Diagonal - GQGD) समावेश आहे. या योजनेच्या माध्यमातून या मार्गावरील दौंड तालुक्यातील विविध ८ रस्त्यांवरील रेल्वे क्रॉसिंग वर रोड ओव्हर ब्रिज (ROB) / रोड अंडर ब्रिज (RUB) उभारण्यात यावेत.
२. रेल्वे सेवा विस्तारण्याच्या व प्रवाश्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या दौंड-पुणे लोहमार्ग विद्युतीकरणाचे काम पूर्ण होऊन ४ वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. तर दौंड - पुणे मार्गावर तातडीने विद्युत लोकल चालू करण्यात यावी. पुणे- दौंड मार्गावर दिवसेंदिवस प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता या मार्गावर धावणाऱ्या लोकलच्या १२ फेऱ्या करण्यात याव्यात.
३. शहरातील रेल्वे हद्दीमध्ये राहणाऱ्या सुमारे ६७० झोपडपट्टीधारक कुटुंबीयांच्या अतिक्रमणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत रेल्वेची मोकळी ३ हेक्टर जागा उपलब्ध करून द्यावी.
४. दौंड रेल्वे कॉर्ड लाइन स्टेशन पूर्णपणे विकसित व प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध होईपर्यंत दौंड नगर मार्गावरील सर्व प्रवासी रेल्वेगाड्यां दौंड स्टेशन वर थांबविण्यात याव्यात. तसेच दौंड कॉर्ड लाइन स्टेशनवर सध्या ५ मिनिटांचा अल्प थांबा आहे कृषी मालाच्या सुरळीत लोडिंगसाठी किमान ३० मिनिटांचा थांबा देण्यात यावा.
खालील रस्त्यांवरील रेल्वे क्रॉसिंगवर रोड ओव्हर ब्रिज किंवा रोड अंडर ब्रिजमध्ये समावेश करण्याची मागणी
१. रामा ११८ ते खुटबाव पिंपळगाव उंडवडी खामगाव नांदूर सहजपूर रस्ता
२. पाटेठाण देवकरवाडी दहिटणे खामगाव कासुर्डी रस्ता
३. भांडगाव खुटबाव एकेरवाडी देलवाडी रस्ता
४. राज्य मार्ग
९ केडगाव बोरीपार्धी दापोडी नानगाव रस्ता ५. वरवंड कडेठाण हातवळण रस्ता
६. पाटस कानगाव रस्ता
७. नानविज गिरीम रस्ता
८. राज्य मार्ग १२३ ते राज्य मार्ग ६० लिंगाळी खोरवडी ते राज्य मार्ग ६८ रस्ता
हेही वाचा- आमच्या परिवारातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला; सरसंघचालकांची मा. गो वैद्य यांना श्रद्धांजली
हेही वाचा- पंतप्रधान मोदींनी दिली रकाबगंज साहिब गुरुद्वाराला भेट; गुरु तेग बहादुरांना वाहिली श्रद्धांजली..