दौंड(पुणे) - पुणे पदवीधर निवडणुकीसाठी दौंडचे आमदार राहुल कुल व भाजपच्या जिल्हा महिला अध्यक्षा कांचन कुल यांनी राहु गावातील कैलास विद्या मंदिर येथील मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावला.
पुणे पदवीधर निवडणुकीसाठी आज (१ डिसेंबर) मतदान पार पडले. आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली होती. दौंड तालुक्यात या निवडणुकीसाठी पाच मतदान केंद्र होते. दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल आणि त्यांच्या पत्नी कांचन कुल यांनी आज राहू गावातील कैलास विद्या मंदिर या विद्यालयातील मतदान केंद्रावर सकाळी मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी आमदार राहुल कुल यांनी निवडणुकीत जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी मतदान करावे, आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन पदवीधर मतदारांना केले.