पुणे - 'कार्यकर्त्यांनी मतदारांना फोन करताना जरा जपूनच बोलावे. कोण कुठल्या विचारांचा आहे, हे काही सांगता येत नाही. रेकॉर्डिंग व्हायरल होऊ शकते,' असे विधान केले होते. त्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे. 'मतदारांना अपमानित करणाऱ्या पक्षाचा आम्ही निषेध करतो', असे शेलार म्हणाले.
पुणे पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री आमदार आशिष शेलार यांची पुण्यातील पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे पदवीधर मतदार संघाचे प्रचार प्रमुख राजेश पांडे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या प्रचार यंत्रणेचा निषेध
महाविकास आघाडीच्या एका नेत्याने निवडणुकीच्या काळात कुठे रेकॉर्डिंग व्हायरल होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मतदारांना फोन करताना जरा जपूनच बोलावे. कोण कुठल्या विचारांचा आहे, हे काही सांगता येत नाही अस विधान केले होते. त्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे. जो पक्ष मतदारांना अपमानित करतो, अशा पक्षाचा आम्ही निषेध करतो. प्रचाराचे मुद्दे आम्ही लोकांसमोर आणत आहोत. वर्षभरात ठाकरे सरकारने महाराष्ट्राची दयनीय अवस्था केली आहे. ठाकरे सरकार पळपुटे सरकार आहे अशी टीकाही यावेळी शेलार यांनी केली आहे.
हेही वाचा - राज्यासाठी पुढचे 15 दिवस धाकधुकीचे! टास्क फोर्सकडून कोरोना वाढण्याचा इशारा
हे सरकार आहे की छळवणुकीचे केंद्र?
गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, शाळा चालू बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा, अस राज्यसरकारने जाहीर केल्याने त्यावरून संभ्रम निर्माण झाला असून भाजपने याच मुद्द्यावरून ठाकरे सरकारला निशाणा साधला आहे. ठाकरे सरकार हे सरकार आहे की छळवणुकीचे केंद्र आहे, अशी बोचरी टीका शेलार यांनी केली आहे. शाळा सुरू करून सरकारने संभ्रमाची अवस्था निर्माण केली आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय घेताना कोणाशीच चर्चा केली नाही. हे सरकार कोणाशी काय चर्चा करणार आहे. अशी टीका यावेळी आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर केलीय.
हेही वाचा - ..अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल अन् त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, मराठा समाजाचा इशारा