ETV Bharat / state

पुणे : मद्य घेऊन तरुणीचा विनयभंग; पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

दीपक माने असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात पोक्सो (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्च्युअल ओफेन्सेस)आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chatushrungi police station news
पुणे : मद्य घेऊन तरुणीचा विनयभंग; पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल
author img

By

Published : Apr 27, 2021, 5:16 PM IST

पुणे - पोलीस दलातील रक्षकच भक्षक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीच्या नातेवाईकांकडून पार्टी घेऊन या पार्टीत एका अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. दीपक माने असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात पोक्सो (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्च्युअल ओफेन्सेस)आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार 20 एप्रिलला रात्री अकरा वाजता घडला. एका 21 वर्षाच्या तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

पोलीस निरीक्षकाकडून युवतीसोबत अश्लील वर्तन -

आरोपी दीपक माने हा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत होता. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी दहा पथके तयार केली आहेत. दीपक माने कार्यरत असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने बालेवाडी परिसरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या दोघा सख्ख्या भावाला पकडले होते. या गुन्ह्याच्या तपासात दरम्यान माने याची आरोपींच्या नातेवाईकांशी ओळख झाली होती. याच ओळखीतून दीपक माने हा 20 एप्रिल रोजी आरोपींचा नातेवाईक व फिर्यादीच्या दाजीच्या फ्लॅटवर पार्टी करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने मद्य घेऊन फिर्यादी व फिर्यादीच्या 16 वर्षाच्या बहिणीला बोलावून घेतले आणि त्यांच्यासोबत अश्लील वर्तन केले. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. चौकशी तथ्य आढळल्याने दीपक माने याला तातडीने निलंबित करण्यात आले. त्यानंतर आता त्याच्याविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - ऑक्सिजनचा काळा बाजार; वाशिममध्ये 64 सिलिंडर जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.