पुणे - गांधीजींचे विचार ऐकायचे नाही तर काय नथुराम गोडसेचे विचार ऐकायचे का, असा प्रश्न गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. पुण्यात तुषार गांधींना बोलण्यापासून रोखल्याबाबत ते आपली प्रतिक्रिया देत होते.
पुणे पोलिसांनी थोडे कठोर व्हायला पाहिजे. पुणेकरांनीच समोर येऊन अशा गोष्टींना विरोध केला पाहिजे, असे मत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मांडले. पुण्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणच्या कार्यक्रमाला आले असता पत्रकारांशी ते बोलत होते.
हेही वाचा - 'जनतेची कामे तातडीने झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करा नाहीतर...'
एल्गार परिषद तपास अंतिम टप्प्यात असताना तो एनआयएकडे दिला जाणे योग्य नाही. तो राज्याच्या अधिकारावर घाला आहे. या प्रकरणात सत्य लवकरच बाहेर येईल, थोडा धीर धरा असेही, आव्हाड यावेळी बोलताना म्हणाले.
हेही वाचा - बिबट्याचा भीषण अपघात; शवविच्छेदनानंतर लवकरच अंत्यसंस्कार करणार...