पुणे- खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे पुणे जिल्ह्याचे (Pune District) आगमन झाले असून, ते मुंबईच्या दिशेने आता रवाना झाले आहेत. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर (Shikrapur) भागात पोलिस प्रशासनाच्या वतीने बाह्यवळण असलेल्या चाकण- तळेगाव मार्गाने (Chakan Talegaon Way) खासदार इम्तियाज जलील व त्यांच्या कार्यकर्त्यांना समुपदेशन करून रवाना करण्यात आले आहे. यावेळी खासदार जलील पोलिसांच्या विनंतीला मान देत चाकण- तळेगाव- शिक्रापूर (Chakan Talegaon Shikrapur) या मार्गाने मुंबईकडे रवाना झाले आहेत.
MP Jalil Leaves Shikrapur : मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम आक्रमक...शिक्रापूरमधून खासदार जलील मुंबईकडे रवाना
मुस्लिम समाजाला आरक्षण (MIM On Muslim Reservation) देण्याच्या मागणीसाठी असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या एमआयएम पक्षाकडून मुंबईत रॅलीचे (MIM Rally In Mumbai) आयोजन करण्यात आले आहे. खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) हे औरंगाबाद ते मुंबई ताफा घेऊन निघाले आहेत. थोड्याचवेळात हा मोर्चा मुंबईच्या वेशीवर धडकेल.आता हा मोर्चा चाकण येथील शिक्रापूर (Shikrapur) येथून निघाला असून, तो थोड्याच वेळात पिंपरी- चिंचवड (Pipmari Chinchavad) येथील रावत या ठिकाणी थांबणार आहे.