पुणे - विविध मागण्यांसाठी राजीव गांधी नगर, कामगार पुतळा, जुना तोफखाना येथील मेट्रोबाधितांनी पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांकडून पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते.
या आहेत मागण्या
- मेट्रोबाधितांना तीन किलोमिटरच्या अंतरावरच मिळावे
- शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे घरे मिळायला हवीत
- बाधितांमध्ये मोठ्या प्रमाणात कष्टकरी नागरिक आहेत. त्यांचे पुनर्वसन करावे.
हेही वाचा - पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात पुण्यात मनसेचे आंदोलन