पुणे- Mumbai Pune Expressway - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून दिलेल्या माहितीनुसार, यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील खंडाळा भागात आज दुपारी 12 ते 2 या वेळेत हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याच्या कामासाठी द्रुतगती मार्गाची पुणे मार्गिका पूर्णतः बंद राहणार आहे. त्याचबरोबर खालापूर टोलनाक्यापासून पुण्याकडे जाणारी वाहने जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वळविण्यात येणार आहेत. आज यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील पुणे वाहिनीवर अमृतांजन पुल व खंडाळा बोगदा येथे हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार आहे.
ब्लाॅकमध्ये मुंबईहून पुण्याला येणारी वाहतूक बंद राहणार आहे. तर पुण्याहून- मुंबईला जाणारी वाहतूक सुरू राहणार आहे. या ब्लाॅकमुळे मुंबईहून पुण्याला येणाऱ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईतून निघणाऱ्या प्रवांशी तसेच मालवाहतूक वाहनांसाठी या वेळेत मेगाब्लाॅक होवू शकतो. आज सकाळी 10 नंतर मुंबईहून पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.
प्रवाशांची होणार गैरसोय- आयटीएमस प्रणालीच्या कामामुळे हलकी वाहने जुन्या मुंबई मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या ब्लाॅकमध्ये मुंबईहून पुण्याला येणारी वाहतूक बंद राहणार आहे. तर पुण्याहून- मुंबईला जाणारी वाहतूक सुरू राहणार आहे. या ब्लाॅकमुळे मुंबईहून पुण्याला येणाऱ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईतून निघणाऱ्या प्रवांशी तसेच मालवाहतूक वाहनांसाठी या वेळेत मेगाब्लाॅक होवू शकतो.
संपूर्ण रस्ता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रणाखाली- मुंबई- पुणे द्रुतगती या 94 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरून दररोज सुमारे 60 हजार वाहने धावतात. या रस्त्यावर वेगाची मर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. तसेच अपघात टाळण्याकरिता कडक नियमही लागू करण्यात आले आहेत. यंत्रणा उभारण्यासाठी 160 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या प्रणालीमुळे वाहतूक शिस्तबद्ध होऊन अपघात टाळण्याची अपेक्षा व्यक्त करणार आहे. त्याबरोबर अचूक टोलवसुली करणेही सोपे होणार आहे. हा संपूर्ण रस्ता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रणाखाली असेल. 39 ठिकाणी वाहनांचा वेग तपासण्यासाठी सरासरी स्पीड डिटेक्शन सिस्टीम आणि लेन डिसिप्लीन व्हायलेशन डिटेक्शन सिस्टीम बसवण्यात येणार आहे.
हेही वाचा-