पुणे - पुण्यातील निवासस्थानी घेतली भेट घेतली असून 3 तारखेला रायगडावर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमणार आहेत. आम्ही ताकदीने सहभागी होणार असल्याचे खेडेकरांनी उदयनराजेंना शब्द दिला आहे. शिवभक्त शिवप्रेमी संघटना मराठा सेवा संघ 2 तारखेलाच गडावर जमणार असल्याची माहिती खेडेकरांनी दिली आहे उदयनराजेंना त्यांनी आम्ही पूर्ण ताकतीने तुमच्या पाठीशी उभा आहोत असा शब्द दिलेला आहे. 3 तारखेच्या मेळाव्याची जोरदार तयारी खासदार उदयनराजे यांच्याकडून करण्यात येत आहे.
राज्यपाल भगतसिंग कोषारी यांची हकालपट्टी करण्यासाठी विरोधकाबरोबरच उदयनराजे आणि संभाजी राजे यांनी आग्रही भूमिका मांडलेली आहे परंतु शासनाकडून त्यावर ठोस निर्णय होत नाही त्यामुळे काल उदयनराजेंनी सर्व संघटनाचे बैठक घेतलेली होती पुण्यात त्यानंतर आज मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडकर यांनी सुद्धा भेट पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही पूर्ण ताकतीने रायगडावर असा शब्द दिला आहे त्यामुळे आता तीन तारखेच्या आक्रोश व्यक्त करण्याच्या कार्यक्रमाचे नियोजन तयारी पूर्ण ताकतीने सुरू करण्यात आली आहे.