ETV Bharat / state

MNS PUNE : म्हणून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो! पहा काय म्हणाले मनसेचे माजी शहराध्यक्ष

पुण्यात कसबा पोटनिडणुकीच प्रचार हे शिगेला पोहचलं असून भारतीय जनता पक्ष तसेच महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहे. अश्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नुकत्याच झालेल्या पुणे दौऱ्यादरम्यान गुप्त बैठक झाल्याने वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे. अश्यातच आत्ता यावर खुद्द अजय शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष अजय शिंदे

author img

By

Published : Feb 23, 2023, 4:28 PM IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष अजय शिंदे

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन महिन्याआधी चर्चा झाली आहे. आणि या चर्चेत आम्ही कोणतीही राजकीय चर्चा केली नाही. तर मी पुण्येश्वर आणि नारायनेश्वर च्या मुद्द्यावर त्यांच्याशी चर्चा केली आहे. अमाच या दोन्ही मंदिराबाबत जे काही आंदोलन सुरू आहे. त्याची कार्यवाही शासनाच्या वतीने व्हावी यासाठी ही भेट होती. यात कोणतीही राजकीय भेट झाली नाही. अस यावेळी शिंदे म्हणाले.

मी माझ्या विठ्ठलाशी एकनिष्ठ : अजय शिंदे यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी निवडणूक लढवली आहे. तसेच काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे देखील यापूर्वी मनसेकडून कसब्यातून लढले होते. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे आणि अजय शिंदे यामधील ही गुप्त बैठक राजकीय वर्तुळात भुवया उंचवणारी ठरत होती. तसेच, शिंदे हे शिवसेनेत जाणार की काय अशी चर्चा सुरू होती. पण मी माझ्या विठ्ठलाशी एकनिष्ठ असून ही भेट या दोन मंदिरांच्या संदर्भात होती.अस देखील यावेळी शिंदे म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भाजपला पाठिंबा : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला आहे. मात्र तरीही मनसे कार्यकर्ते हे आतून धंगेकर यांचेच काम करीत आहे. आणि कालच मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करताना रविंद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल बांदांगे, रिझवान मिरजकर, प्रकाश ढमढेरे, निलेश प्रकाश निकम हे मनसैनिक आढळून आले आहेत तसेच गेले काही वर्षापासून ते पक्षात कार्यरत नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठ नेते शबाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, राजेंद्र (बाबु) वागसकर यांच्या आदेशाने पक्षविरोधी काम करणाऱ्या या सर्वांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर : कसबा पोटनिवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे मात्र या निवडणुकीत राज ठाकरेंच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या काही जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत मनसेच्या वतीने एक पत्र प्रसिद्धीला दिलं आहे. त्यात रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल बांढांगे, रिझवान मिरजकर, प्रकाश ढमढेरे हे पक्षविरोधी काम करताना आढळून आले आहेत. तसेच ते गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात कार्यरत नाही. त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, राजेंद्र वागसकर यांच्या आदेशाने हे पत्र काढण्यात आले आहे.

पुण्याच्या शहर मध्यवर्ती कार्यालयात बैठक : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. भाजपने कसब्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. शिवाय भाजपला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा मिळाला आहे. मात्र पुण्यात पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कारवाईचे निर्देश दिले आहे. पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती, विश्वसनीय सूत्रांनी दिली होती. बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली. पुण्याच्या शहर मध्यवर्ती कार्यालयात बैठक पार पडली. कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीला मदत होणार नाही, याची काळजी घ्या, जास्तीत जास्त भाजपला मतदान करण्यासाठी कामाला लागा. मनसे उघडपणे प्रचारात उतरणार नाही, मात्र मनसेची 100 टक्के मदत ही भाजपला व्हायला हवी अशा सूचना नांदगावकर यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत

हेही वाचा : काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांना अंतरिम जामीन, आसाम पोलिसांनी केली होती अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.