पुणे - गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. आज (दि.२७ जुलै) दुपारनंतर नारायणगावातून वाहणाऱ्या मीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली. यामुळे नारायणगाव व वारूळवाडीला जोडणारा मुख्य पूल पाण्याखाली गेला आहे.
पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास नदीपात्रातील पाणी बाहेर येण्याची शक्यता असून, पात्रानजिक असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.