पुणे Lalit Patil Drug Case : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. आतापर्यंत या सगळ्या प्रकरणांमध्ये पुणे पोलिसांनी (Pune Police) या रॅकेटमध्ये सहभागी लोक, पुरवठादार, विक्री करणारे लोक यांच्यावर कारवाई केली आहे. तसंच ससून हॉस्पिटलमधून (Sassoon Hospital Pune) ललित पाटील पळून गेला होता तिथला एक कर्मचारी, त्याचबरोबर दोन पोलीस अधिकारी आणि ससून हॉस्पिटलमध्ये इतर कैदी असलेले विनय अरहाना यांना पोलिसांनी अटक केली होती.
कारागृह मेडिकल ऑफिसरला अटक : या सगळ्या प्रकारामध्ये कारागृह प्रशासनावर सुद्धा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु कारागृहातील कुणालाही आतापर्यंत अटक करण्यात आली नव्हती. प्रथमच यासंदर्भात आता कारागृह मेडिकल ऑफिसरला पुणे पोलिसांनी चौकशीसाठी अटक केली आहे.
पुणे पोलिसांनी केली कारवाई : पुणे ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहाचा (Yerwada Jail Medical Officer) मेडिकल ऑफिसर संजय मरसाळे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. संजय मरसाळे यांनी ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ससून हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. राज्य कारागृहाच्या मेडिकल ऑफिसरला पुणे पोलिसांनी अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
ललितला पुन्हा पोटदुखीचा त्रास : सध्या ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांच्या ताब्यात असताना ललित पाटील याला आता पुन्हा एकदा हर्नीया आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. याआधी देखील या आजाराच्या नावाखाली ललित पाटील हा ससून रुग्णालयात 9 महिने तळ ठोकून होता आणि ससून मधूनच तो ड्रग्जचा व्यवहार करत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ससूनमध्ये उपचार सुरू असतानाच ललित पाटीलने पलायान केलं होतंं. यानंतर त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती.
हेही वाचा -
- Drug Search Operation Nashik : गिरणा नदीत ड्रग्ज मिळालं नाही, पण पोलिसांकडून 20 कोटी लिटर पाणी वाया
- Lalit Patil Drug Case : ललित पाटील प्रकरणात संजय राऊत यांचे थेट लागेबांधे; संजय गायकवाडांचा गंभीर आरोप
- Ravindra Dhangekar PC : ललित पाटील प्रकरणात डॉ. संजीव ठाकूर यांना सहआरोपी करावं - आमदार रवींद्र धंगेकर