पुणे - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतात लॉकडाऊन जाहीर केले. याचा याचा सर्वाधिक फटका पुण्याच्या बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना बसला आहे. लॉकडाऊन असल्याने महिलांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.
हातावरच पोट असल्याने या महिलांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे पुण्यातील महाराष्ट्र तरुण मंडळातर्फे या सर्व वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या महिलांना येणाऱ्या विविध अडचणी सोडण्यास आतापर्यंत कोणी पुढे आले नाही. त्यामुळे या महिलांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यासाठी आज महाराष्ट्र तरूण मंडळातर्फे या सर्व महिलांना 2 वेळच्या जेवणाची सोय करून देण्यात आली आहे.