ETV Bharat / state

Dr. Mangal Narlikar passed away : प्रख्यात गणितज्ञ डॉ. मंगला जयंत नारळीकर यांचे निधन - प्रख्यात गणितज्ञ डॉ मंगला जयंत नारळीकर यांचे निधन

जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी मंगला नारळीकर यांचे पुण्यात वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले. फुप्फुसाच्या कर्करोगाने त्या आजारी होत्या.(Dr. Mangal Narlikar passed away)

Dr. Mangal Narlikar passed away
डॉ मंगल नारळीकर यांचे निधन
author img

By

Published : Jul 17, 2023, 2:29 PM IST

पुणे: जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी मंगला नारळीकर याची ज्येष्ठ गणिततज्ज्ञ अशी ओळख आहे. त्यांचे पुण्यात राहत्या घरीच निधन झाले. मृत्यू समयी त्या 80 वर्षाच्या होत्या. या पुर्वी त्यांना स्तनाचा कर्करोग झाला होता त्यावर त्यांनी यशस्वी मात केली होती. मात्र नंतर त्यांना फुप्फुसाचा कर्करोगाने ग्रासले. त्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

मंगला नारळीकर पुर्वाश्रमीच्या मंगला राजवाडे होत्या. त्यांचा जन्म 17 ने 1943 रोजी झाला. त्यांनी 1962 साली मुंबई विद्यापीठातून बी.ए. ही पदवी घेतली. त्यानंतर 1964 साली त्यांनी गणितात एमए केले. यावेळी त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या होत्या. त्यांना त्यावेळी सुवर्णपदकही मिळाले होते. 1964 ते 1966 या कालावधित त्यांनी मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत गणित विषयाच्या सहाय्यक आणि नंतर सहयोगी संशोधक या पदांवर काम केले. त्यांनी 1967 ते 1969 या काळात केंब्रिज विद्यापीठातही गणित विषयाच्या अध्यापनाचे काम केले.

1965 मधे त्यांचा विवाह प्रसिध्द शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्याशी झाला. डॉ. मंगला यांनी प्रगत गणितावर मोठे काम केले. लहान मुलांना गणित सोप्या भाषेत समजावून सांगण्यात त्यांचा मोठा हातखंडा होता. त्यांची इंग्रजीसोबत मराठी भाषेतही अनेक पुस्तके आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठीचे नभात हसरे तारे, गणिताच्या सोप्या वाटा, यासह पाहिलेले देश, भेटलेली माणसे अशी त्यांची प्रवास वर्णनेही प्रसिध्द आहेत.

डॉ. मंगला नारळीकर यांची अध्यापकीय कारकीर्द मोठी राहिली. मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च तसेच केंब्रिज विद्यापीठा सोबत त्यांनी तेव्हाचे पुणे विद्यापीठ तसेच ईतर नामवंत संस्थांमध्येही संशोधनासह अध्यापन क्षेत्रात योगदान देत आपली वेगळी ओळख निर्माण केली.

कुटुंबातील सदस्याने दिलेल्या माहितीनुसार डॉ. मंगला नारळीकर एक वर्षाहून अधिक काळ कर्करोगाशी झुंज देत होत्या, त्यांच्या पश्चात पती, तीन मुली आणि पाच नातवंडे असा परिवार आहे. 1989 मध्ये, हे जोडपे पुण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.