पिंपरी-चिंचवड - दापोडी येथील स्थानकात जनरेटला रुमला आग लागली ( Dapodi Railway Station Fire ) आहे. रात्री साडेसातच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या पोहचल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तेथील वीज आणि सिग्नल यंत्रणा बंद करण्यात आली आहे. या आगीमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी रेल्वे स्थानकातील जनरेटर रूमला भीषण आग लागली. यात, जनरेटर रूममधील साहित्य जळून खाक झाले आहे. आगीचे लोळ मोठे असल्याने तेथील सिग्नल यंत्रणा, फाटक बंद करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.
काही मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून, लांब पल्ल्यांच्या गाड्या उशिरा धावणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
हेही वाचा - Vijay Wadettiwar Reaction : ओबीसी आरक्षण लागू न होणे ही माझी वैयक्तिक जबाबदारी नाही - मंत्री विजय वडेट्टीवार