पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 23 वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. लग्नाचे आमिष दाखवून आणि धमकी देऊन बलात्कार करण्यात आल्याचा आरोप या महिलेने केला आहे. गंभीर बाब म्हणजे पीडित महिलेला अगरबत्तीने चटके देत हे कृत्य केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राजेश ज्ञानेश्वर पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला हे ओळखीचे आहेत. आरोपीने या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून आणि तिचे टॉपलेस फोटो वडील आणि पतीला पाठवण्याची धमकी देऊन तिला अगरबत्तीचे चटके देत वारंवार बलात्कार केला आहे. हा सर्व प्रकार जानेवारी 2020 पासून सुरू होता. आरोपीने किवळे, थेरगाव येथील परिसरात विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. आता त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली आहे. या घटनेप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सपना देवतळे तपास करत आहेत.
धक्कादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये अगरबत्तीचे चटके देत विवाहित महिलेवर बलात्कार - पिंपरी-चिंचवड महिला बलात्कार न्यूज
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला हे ओळखीचे आहेत. आरोपीने या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून आणि तिचे टॉपलेस फोटो वडील आणि पतीला पाठवण्याची धमकी देऊन तिला अगरबत्तीचे चटके देत वारंवार बलात्कार केला आहे. हा सर्व प्रकार जानेवारी 2020 पासून सुरू होता.