ETV Bharat / state

फ्लॅटचे हप्ते थकल्याने शेजाऱ्यांचे टोमणे, तणावातून विवाहितेची आत्महत्या - पुण्यातून महिलेची आत्महत्या

दोन महिलांनी वैशाली राऊळ यांच्यावर फ्लॅटचा हप्ता भरू शकत नाही, तुझ्या घरी कुणीतरी येते, असा आरोप केला. चारित्र्यावर संशय घेत अश्लील आरोप केले. चारित्र्यावर संशय घेतल्याचा धक्का वैशाली यांना सहन झाला नाही आणि त्यांनी त्याच दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, महिलेच्या पतीने या धक्क्यातून सावरल्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.

women committed suicide
पुण्यात विवाहितेची आत्महत्या
author img

By

Published : Jun 24, 2020, 1:29 PM IST

Updated : Jun 27, 2020, 5:25 PM IST

पुणे - लॉकडाऊन काळात फ्लॅटचे हप्ते देऊ न शकल्याने आंबेगाव खुर्द परिसरातील महिलेचा घरमालकाशी वाद झाला. त्यात शेजारील महिलाही चारित्र्यावर संशय घेत टोमणे मारत असत. याच कारणामुळे विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. वैशाली राऊळ (वय 30), असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेच्या पतीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव खुर्द येथील श्रुष्टीलेक अपार्टमेंटमध्ये ही महिला पतीसह राहत होती. पती रिक्षाचालक, तर मृत महिला ब्यूटी पार्लर चालवत होती. तीन वर्षांपूर्वी त्यांनी श्रुष्टीलेक अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेतला होता. दरम्यान, अचानक लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे रिक्षा थांबली, ब्यूटी पार्लरही बंद झाले. परिणामी घराचे हप्तेही थकले होते. अशात आरोपी महिला सतत वैशाली राऊळ यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना टोमणे मारत होत्या, असे तक्रारीत म्हटले आहे.

रविवारी १४ जूनला या दोन महिलांचे आणि तक्रारदाराच्या पत्नीचे याच कारणावरून भांडण झाले. यावेळी या दोन महिलांनी वैशाली राऊळ यांच्यावर फ्लॅटचा हप्ता भरू शकत नाही, तुझ्या घरी कुणीतरी येते असा आरोप केला. चारित्र्यावर संशय घेत अश्लील आरोप केले. चारित्र्यावर संशय घेतल्याचा धक्का वैशाली यांना सहन झाला नाही आणि त्यांनी त्याच दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, महिलेच्या पतीने या धक्क्यातून सावरल्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानुसार दोन महिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर करत आहेत.

Last Updated : Jun 27, 2020, 5:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.