पुणे - विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. येथील विजयनगर काळेवाडी येथे ही महिला राहत होती. अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. सरिता सचिन खुंजावटे (वय-२६ रा. ओंकार कॉलनी, विजयनगर, काळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. खुंजावटे कुटुंबीय हे मुळचे सातारा जिल्ह्यातील आहेत.
हेही वाचा - पुण्यात ४० वर्षीय नराधमाचा चिमुरडीवर बलात्कार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षापूर्वी सरिता यांचा सचिन खुंजावटे यांच्याशी विवाह झाला होता. मागील काही वर्षापासून काळेवाडी येथे ते राहत आहेत. सरिता यांचे पती सचिन हे एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. रविवारी रात्री सर्वजण घरात असताना सरिता यांनी अचानक त्यांच्या खोलीचे दार बंद करून ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. घरातील सदस्यांनी बराच वेळ दार ठोठावूनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी शेजाऱ्यांच्या मदतीने खोलीचे दार तोडून सरिता यांचा मृतदेह खाली उतरवण्यात आला. वाकड पोलीस तपास करत आहेत.