ETV Bharat / state

'चांदा ते बांद्यापर्यंतच्या सर्वच माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची करणार'

अलीकडच्या काळात इंग्रजी माध्यमातून शिकण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी बोलण्यास अडथळे येऊ लागले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच शाळांमध्ये १ ली ते १० वी पर्यंत मराठी विषय हा सक्तीचा करणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

author img

By

Published : Jan 10, 2020, 8:25 PM IST

Updated : Jan 10, 2020, 11:28 PM IST

Marathi will be compulsory in all schools in Maharashtra
उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे - महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी लिहिता वाचता येणे अपेक्षित आहे. अलीकडच्या काळात इंग्रजी माध्यमातून शिकण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी बोलण्यास अडथळे येऊ लागले आहेत. ही बाब महाराष्ट्रासाठी नक्कीच भूषणावह नाही. त्यामुळे राज्यातील सर्वच शाळांमध्ये १ ली ते १० वी पर्यंत मराठी विषय हा सक्तीचा करणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत आले. यावेळी अजित पवारांचे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. बारामती तालुका व शहर यांच्या वतीने अजित पवारांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. त्यानंतर अजित पवार बोलत होते. बारामतीकरांच्या विकासासाठी मी सदैव कटीबद्ध असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.

'राज्यातील सर्वच शाळांमध्ये मराठी सक्तीची करणार'

पोलिसांसाठी ऐतिहासीक निर्णय घेणार
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशातील पोलीस खात्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता. पोलिसांची हाफ पॅन्ट बदलून फुल पॅन्ट करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला होता. तसाच ऐतिहासिक निर्णय घेऊन महाराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्यांना 180 स्क्वेअर फुटाचे घर आहे, त्यात बदल करून ५०० स्क्वेअर फुटाचे सुसज्ज घर बांधून देणार असल्याचे पवार म्हणाले.

अजित पवारांचे ढोल ताश्यांच्या गजरात जंगी स्वागत

भेदभाव न करता निधी देणार
उपमुख्यमंत्री झाल्याने आणखी माझी जबाबदारी वाढली आहे. विकासाच्या बाबतीत कोणताही भेदभाव न करता निधी देण्याचे काम करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. काही केलं तरी मनुष्य स्वभाव आहे, त्यामुळे बारामतीकरांच्या विकासासाठी जास्त निधी देणार असल्याचे पवार म्हणाले. बारामतीकरांच्या उपकारांची या जन्मातही फेड होणार नाही. त्यांच्या विकासासाठी, त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असल्याचे पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार

माझा सत्कार म्हणजे बारामतीकरांचा सन्मान

तमाम बारामतीकरांनी मला १ लाख ६५ हजारांचं मताधिक्य विधानसभेला मिळवून दिलं ही खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्या या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. आजचा हा नागरी सत्कार हा एकट्या अजित पवारांचा सत्कार नसून सर्व बारामतीकरांचा व इथल्या घराघरातल्या प्रत्येकाचा हा सन्मान आहे. या जन्मी बारामतीकरांचा मी उत्तराई होऊ शकत नसल्याचे मत पवारांनी नागरी सत्काराला उत्तर देताना केले आहे.

BARAMATI
अजित पवारांचे बारामतीत जंगी स्वागत

अधिकारी, कर्मचार्‍यांना दमबाजी करू नका
दिवस बदलत असतात. चार दिवस सासुचे आले, तर चार दिवस सुनेचे देखील येतात. विश्वासाला तडा जाऊ न देण्याचं काम करावं लागणार आहे. समाजातल्या वेगवेगळ्या घटकाला कशाप्रकारे मदत होईल, हे आम्ही पाहू. मात्र, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यामध्ये माझ्यासाहित अधिकारी, कर्मचार्‍यांना दमबाजी करू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

अजित पवारांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

  • सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा अनिवार्य करणार
  • बारामतीच्या जिरायत भागातील पाणी प्रश्न निकाली काढणार
  • बारामतीसाठी ‘बृहण बारामती’ पाणी योजनेसाठी २०० कोटी मंजूर
  • मेडिकल कॉलेज रुग्णालयासाठी १०० कोटी
  • नियमित कर्ज फेडणार्‍यां शेतकर्‍यांची निराशा होणार नाही
  • राज्यात पोलिसांना ५०० स्वेअर फुटांचे घर देणार
  • बारामती हे मध्य रेल्वे स्थानक करण्यासाठी प्रयत्न करणार
  • पुरंदरला विमानतळ होणे गरजेचे आहे.
  • मेट्रोचे सर्व प्रकल्प होणे गरजेचे आहे.
  • विकासकामे करताना कोणत्याही भागाबाबत निधी देण्याबाबत दुजाभाव करणार नाही.

Intro:Body:बारामती..

मराठी विषय सक्तीचा
उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला अस्खलित मराठी लिहिता वाचता येणे येणे अपेक्षित आहे अलीकडील काळात इंग्रजी माध्यमातून शिकण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे मात्र या इंग्रजी माध्यमातून मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी बोलण्यास अडथळे येऊ येऊ लागल्याचे दिसून येऊ लागले आहे ही बाब महाराष्ट्रासाठी नक्कीच भूषणावह नाही त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच शाळांमधून पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय हा कंपल्सरी करणार असल्याचे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले

उपमुख्यमंत्री ची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत आले. बारामती तालुका व शहर यांच्या वतीने अजित पवारांचा जाहीर नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी पवार बोलत होते..

पुढे बोलताना पवार म्हणाले की. राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी देशातील पोलीस खात्यातील एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता तो म्हणजे पोलिसांची असणारी हाफ पॅन्ट बदलून फुल पॅन्ट करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. तसाच ऐतिहासिक निर्णय घेऊन सध्या महाराष्ट्रातील पोलीस कर्मचारी पोलीस कर्मचाऱ्यांना 180 स्क्वेअर फुटाचे घर आहे त्यात बदल करून पाचशे स्क्वेअर फुटाचे सुसज्ज असे घर लवकरच त्यांना बांधून दिले जाणार असल्याचे पवार म्हणाले.Conclusion:
Last Updated : Jan 10, 2020, 11:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.