ETV Bharat / state

Maratha Reservation Protest : 'कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं त्यांनी घ्यावं, अन्यथा...', नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे? वाचा सविस्तर - Maha Govt

Maratha Reservation Protest : बारामती शहरातील तीन हत्ती चाैकात मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा पार पडली. यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी काय-काय करावं लागेल, या संदर्भात महत्त्वाच्या सूचना दिल्या.

Manoj Jarange Patil Baramati Sabha
मनोज जरांगे पाटील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2023, 8:25 AM IST

बारामती Manoj Jarange Patil Baramati Sabha : मंडल आयोगानं ज्या जाती ओबीसीमध्ये घेतल्या, कायद्यानं जेवढ्या जाती ओबीसीमध्ये समाविष्ट केल्या आहेत, त्या सर्व जातीचा समावेश पोटजाती म्हणून आहे. मग मराठ्यांची पोटजात कुणबी का नाही?', असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला. तसंच मराठा समाजातील जे गरजू नाही, त्यांनी कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं नसल्यास घेऊ नये, अन्यथा गप्प बसावं. मराठ्यांशी गद्दारी नको, असा इशाराही यावेळी मनोज जरांगे यांनी दिला आहे.

22 ऑक्टोबरनंतर आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करु : राज्य सरकारकडं आरक्षणाच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडं मराठीत उत्तर आहे, पण सरकारकडं नाही. मराठ्यांनी सरकारला वेळ मागितली नाही, सरकारनं मराठा आरक्षण देण्यासाठी वेळ मागितलाय. जर आरक्षणाचा निर्णय झाला नाही, तर २२ तारखेला आंदोलनाची पुढील दिशा समजेल. तसंच कुणबीला सुधारित शब्द शेती आहे. आम्ही शेती कसतो, जगाला रोजीरोटी पुरवतो, शेती करतो म्हणून आम्ही कुणबी. त्यामुळे सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया तत्काळ सुरु करावी. ज्यांना घ्यायचे त्यांनी घ्यावं, अन्यथा नको असल्यास गप्प बसावं, असंही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.

तुमची जात ओबीसीत कशी गेली? : पुढं ते म्हणाले की, पुरेसे पुरावे असल्याशिवाय कुणबी प्रमाणपत्र देता येत नसल्याचं सांगितलं जात आहे. मग तुमची जात ओबीसीत कशी गेली?, कोणत्या आधारे गेली हे सांगा, असा सवाल करत जरांगे पाटील म्हणाले, एका रात्रीत आरक्षणाच्या यादीत जाती घुसविल्या गेल्या. मंडल आयोगाच्या आरक्षणात अन्य पोटजाती घुसल्या, मग मराठ्यांचीच पोट जात कुणबी का होवू शकत नाही?, याचं उत्तर त्यांनी द्यावं, असंही मनोज जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हेही वाचा -

  1. Manoj Jarange Patil Sabha Video : 'मराठा समाजाच्या आत्महत्यांना सरकारच जबाबदार; इंचभर मागं हटणार नाही'
  2. Maratha Reservation Protest : मनोज जरांगे पाटील सभेपूर्वी शिवनेरी किल्ल्यावर; शिवाई देवी, छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतलं दर्शन
  3. Manoj Jarange Patil Sabha : मला बोलू द्या नाहीतर... ; मनोज जरांगे यांच्या सभेत गोंधळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.