पुणे Maratha Reservation Issue : जरांगे पाटील म्हणाले, आपल्या आई-वडिलांनी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना मोठं केलं आहे. कधीतरी आपल्याला गरज पडल्यावर नेते कामाला येतील असं म्हणून मोठं केलं. आज आपल्याला, लेकरांना आरक्षणाची गरज आहे. कुठलाही राजकीय पक्ष आज आपल्याकडे पाहायला तयार नाही. त्यामुळे यापुढे आरक्षण द्यावे लागेल. नाहीतर मराठा नेत्यांना आता मोठं करणार नाही. आता तुम्हाला आरक्षण द्यावंच लागेल असा इशारा मनोज जरांगे यांनी पुण्यात दिला आहे. (Jarange Patil on Maratha Reservation)
आम्ही अगोदर कुणबीच : मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे नाव घेत नाही. त्यांची लायकी राहिली नाही. ते ओबीसी 60% असल्याचं म्हणतात. वय झाल्यानं काही माणसं बरगळत आहेत. मराठा आरक्षण विरोधात कुणी बोलले तर आम्ही वाजवतो. मग तो मराठा का असेना. कारण आम्ही अगोदरच कुणबी आहोत. तुम्ही आम्हाला फसवलेलं आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले. निजामाच्या काळात मराठा कुणबी असल्याच्या नोंदी मिळाल्या. म्हणून मुख्यमंत्र्यांनी समितीची कार्यकक्षा वाढवून घेतली आहे. कुणबी आणि मराठा एकच आहेत. तुम्हाला लाज वाटत असेल तर वावर विकून जा. मराठा मुलांचं चांगलं होत आहे. मी पण सगळ्यांना वाकवलं आहे. आम्हाला आरक्षण द्यावं लागेल, असं मनोज जरांगे यांनी म्हटलय.
तर गाठ आमच्याशी : छगन भुजबळ हे एकटेच साठ टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करतात, असं म्हणतात; आज पर्यंत त्यांचं आणि माझं वैयक्तिक भांडण नव्हतं; पण आजपासून आमचं वैयक्तिकसुद्धा तुमच्या सोबत भांडण असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं असून सरकारवरसुद्धा निशाणा साधलेला आहे. यापुढे कुठलाही मराठा नेता असो ओबीसी नेता जर मराठा आरक्षणाला विरोध करत असेल तर गाठ आमच्याशी आहे, असा इशारासुद्धा जरांगे पाटलांनी दिला आहे. त्यामुळे मराठा समाजाला तुम्हाला आरक्षण द्यावेच लागेल असंसुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे.
तर भुजबळांनी राजीनामा द्यावा : मराठा आंदोलकांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. भुजबळांनी केलेली विधानं चुकीची आहेत. आज जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचं काम ते करताय. आज भुजबळांना पुण्यातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यातून विरोध होत आहे. तसंच भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा त्यानंतर सभा घ्याव्या, असं मराठा आंदोलकांनी म्हंटलंय.
हेही वाचा: