ETV Bharat / state

Maratha Morcha Baramati: अजित पवारांचा पेच आणखीनच वाढला; सरकारमधून बाहेर पडण्याचं बारामतीकरांचं आवाहन - बारामती बंद

Maratha Morcha Baramati : बारामतीत आज जालन्यात झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलंय. आता या मोर्चामुळं अजित पवारांच्यापुढील पेच आणखीनच वाढलाय. या मोर्चादरम्यान 'अजित पवार सरकारच्या बाहेर पडा', अशी घोषणाबाजी करण्यात आलीय.

Maratha Morcha Baramati
बारामतीत मराठा बांधवांचा मोर्चा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2023, 4:45 PM IST

Updated : Sep 4, 2023, 4:59 PM IST

बारामतीत मराठा बांधवांचा मोर्चा

पुणे Maratha Morcha Baramati : जालन्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रातील मराठा समाज आक्रमक झालाय. महाराष्ट्रात ठिकठिकाणी बंदची हाक देण्यात आलीय. आज बारामतीत देखील कडकडीत बंद पाळण्यात आलाय. 'सरकारचा भरलाय घडा, अजित पवार सरकारच्या बाहेर पडा' अशा घोषणांनी बारामती दणाणून सोडलीय. मराठा बांधवांकडून आज बारामती बंदची हाक देण्यात आली होती. मोठा मोर्चा देखील आज काढण्यात आला होता. यावेळी या रॅलीत अनेक मराठा बांधवांनी अजित पवारांच्या संबंधी अशा घोषणा दिल्या आहेत.

अजित पवारांचे दौरे रद्द : जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर लाठीमार केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलाय. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात राजकारण्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात आलीय. बारामतीमध्ये देखील मराठा बांधव आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. एकीकडं मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर अजित पवार यांनी काढता पाय घेतल्याचं दिसतंय. बुलडाणा आणि पिंपरी-चिंचवडमध्ये असलेला दौरा ऐनवेळी त्यांनी तब्येतीचं कारण देऊन रद्द केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुलडाण्यातील जाहीर सभेत अजित पवारांनी दौरा का रद्द केला, हे सांगावं लागलं. आता दुसरीकडे आमचं सरकार हे फेविकॉलचा जोड सरकार असल्याचं ते सांगत आहेत. आम्ही एकत्र असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तसं असलं तरी आता थेट बारामतीमधूनच अजित पवार यांना नागरिकांनी भावनिक (Baramati Maratha protesters) आवाहन केलंय.

बारामतीकरांचं अजित पवारांना आवाहन : 'सरकारचा भरलाय घडा, अजित पवार सरकारमधून बाहेर पडा' अशा घोषणा दिल्यानं अजित पवार याकडे कसं बघतात? त्याची नेमकी प्रतिक्रिया काय येते, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. मराठा बांधवांवर झालेल्या लाठीमारामुळं अजित पवार हे मात्र वेगळ्याच द्विधा अवस्थेत सापडले आहेत. काही दिवसांपूर्वीच बारामतीकरांनी अजित पवारांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं होतं. आता तेच बारामतीकर त्यांना सरकारमधून बाहेर पडण्याचं आवाहन करत आहेत. त्यामुळे अजित पवार हे नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. (Maratha protesters slogans on Ajit Pawar)

हेही वाचा :

  1. Maratha Reservation issue: लाठीचार्जचे आरोप सिद्ध करा, अन्यथा राजकारण सोडा-उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विरोधकांना आव्हान
  2. Maratha Protest : मराठा आरक्षणासाठी समाज रस्त्यावर, संभाजीनगरमध्ये युवकाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न
  3. Pankaja Munde On Maratha Reservation : मराठा आंदोलनाबाबत चौकशी झाली पाहिजे - पंकजा मुंडे

Last Updated : Sep 4, 2023, 4:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.