पुणे : आजपर्यंत आपण सुनेने सासरला कंटाळून आत्महत्या केलेले ऐकले असेल. पुण्यात मात्र वेगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासरचे लोक त्रास देत असल्याने एका 38 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली ( Man Tired In Laws Torture suicide ) आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ( Complaint lodged at Khadki Police Station ) आहे.
गळफास घेत संपवले : पत्नी तसेच सासरच्या लोकांकडून सारखा त्रास देण्यात असल्याने समीर नाईक यांनी गळफास घेत जीवन संपवले ( Committed suicide by hanging ) आहे. नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पत्नी उषा, सासू, सासरे, मामा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर यांचे वडील निवृत्ती भगवंत नाईक (वय ६५, रा. चांभुर्डी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांनी या संदर्भात खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अकस्मात मृत्यूची नोंद : याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. समीरच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर समीर यांच्या पत्नी उषा नाईक, यासह सासरची मंडळी सरसाबाई पंढरकर, रामचंद्र पंढरकर, मलसिंग आढाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
12 वर्षीय मुलगी : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर आणि उषा यांना एक 12 वर्षीय मुलगी देखील आहे. मात्र गेल्या 4 वर्षांपासून पत्नी उषा आणि सासरचे लोक वारंवार समीरकडे पैशाची मागणी करत होते. यावरून समीर आणि उषा यांच्यात नेहमीच वाद होते. समीरने पत्नी उशाला 10 लाख रुपये दिले होते. मात्र तरीदेखील पत्नी आणि नातेवाईकांच्या मानसिक त्रास काही कमी होत नव्हता. या जीवघेण्या त्रासाला कंटाळून समीरने गळफास घेत आपले जीवन संपवले. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत.