ETV Bharat / state

कौमार्य चाचणीची अनिष्ट प्रथा झुगारत आणखी एक विवाह

कंजारभाट समाजात लग्नापूर्वी कौमार्य चाचणी करण्याची प्रथा आहे. मात्र, या अनिष्ठ प्रथेला फाटा देत कौमार्य चाचणीस न करता लग्न करणार असल्याचा निर्णय एका तरुणाने घेतला आहे. त्याचे मगंळवारी (दि. 8 डिसें.) लग्न होणार आहे.

प्रातिनिधक छायाचित्र
प्रातिनिधक छायाचित्र
author img

By

Published : Dec 8, 2020, 7:10 PM IST

Updated : Dec 8, 2020, 7:40 PM IST

पुणे - कंजारभाट समाजात लग्नापूर्वी कौमार्य चाचणी करण्याची प्रथा आहे. मात्र, या अनिष्ठ प्रथेला फाटा देत कौमार्य चाचणीस न करता लग्न करणार असल्याचा निर्णय एका तरुणाने घेतला आहे. त्याचे मगंळवारी (दि. 8 डिसें.) लग्न होणार आहे. यापूर्वी या समाजात अशाप्रकारे तीन विवाह झाले असून हा चौथा विवाह ठरणार आहे.

बोलताना विवेक तमायचीकर

समाजाची भिती, दडपण झुगारून समाजातील काही धाडसी मुलींनीही कौमार्य परीक्षा देणार नाही, असे सांगत विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. समाजामध्ये आजही छुप्या स्वरूपात ही प्रथा काही ठिकाणी सुरू आहे. हे प्रकार पूर्णपणे थांबायलाच पाहिजे. हा प्रकार म्हणजे व्यक्तीस्वातंत्र्यावर, खासगीपणावर गदा आहे, असे विवेक तमायचीकर यांनी व्यक्त केले.

स्टॉप व्ही टेस्ट योजनेला प्रतिसाद

दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2018 साली 'स्टॉप व्ही टेस्ट' अभियान या समाजातील तरुण-तरुणींनी राबवले. ठाण्याच्या अंबरनाथ येथील विवेक तमायचीकर यांनी हे अभियान सुरू केले होते. 2018 मध्ये त्यांनी समाजाच्या रूढी-परंपरेच्या विरोधात जाऊन पिपरी-चिंचवड येथील तरुणीशी लग्न केले होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत या अनिष्ठ प्रथेला मूठमाती देण्यासाठी कौमार्य परीक्षा चाचणी न करता लग्न करण्याचा निर्णय आजच्या जोडप्याने घेतला.

वधूच्या वडिलांनी कौमार्य चाचणीला फाटा देत 1996 मध्ये केले होते लग्न

आज लग्न होत असलेल्या वधूच्या वडिलांनीही 1996 मध्ये या प्रथेला विरोध करून नोंदणी पद्धतीने विवाह केला होता. त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागली होती. मात्र, समाजात बदल आणायचा असेल तर आता तरुणांनीच पुढाकार घेऊन अशा अनिष्ट रुढी-परंपरांना चाप लावायला हवा, असा या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे.

हेही वाचा - सिरमने मागितली लसीच्या मान्यतेसाठी आपत्कालीन परवानगी

हेही वाचा - पुण्यात दोन वर्षानंतर पुन्हा पेट्रोलचे दर नव्वदीत; नागरिकांच्या खिशाला कात्री

Last Updated : Dec 8, 2020, 7:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.