ETV Bharat / state

मुंबई-लातूर-बिदर एक्सप्रेसमध्ये मारहाण; अंत्यविधीला जाणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू

मुंबई-लातूर-बिदर एक्सप्रेसमध्ये एका 26 वर्षीय तरुणाचा मारहाणीत जागीच मृत्यू झाला. सागर जनार्धन मारकड (वय 26) असे या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले.

man killed in Mumbai-Latur-Bidar Express

author img

By

Published : Feb 13, 2020, 8:31 PM IST

Updated : Feb 14, 2020, 11:36 AM IST

पुणे - मुंबई-लातूर-बिदर एक्सप्रेसमध्ये एका तरुणाला मारहाण करण्यात आली. यामध्ये त्या तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. सागर जनार्धन मारकड (वय 26) असे या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले.

मुंबई-लातूर-बिदर एक्सप्रेसमध्ये मारहाण

मृत सागर हा पत्नी, लहान मुलगी आणि आईसोबत पत्नीच्या चुलतीच्या अंत्यविधीसाठी सोलापूर येथे जाण्यासाठी निघाले होते. पुणे रेल्वे स्टेशनवरून मुंबई-लातूर-बिदर एक्सप्रेस गाडीत ते चढले. जनरल डब्यात बसण्यासाठी जागा नसल्याने सागर मारकड आणि त्याचे सर्व कुटूंब उभे होते. गाडी पुणे रेल्वे स्टेशनपासून सुटल्यानंतर सागर यांनी दरवाजा लगत असलेल्या सीटवरील एका महिलेला, पत्नी आणि लहान मुलीला बसण्यासाठी थोडी जागा देण्याची विनंती केली. तेव्हा त्या महिलेने आणि तिच्या पतीने सागर यांना शिवीगाळ केली.

सागर जनार्धन मारकड यांच्या मदतीला कोणीही आले नाही

हेही वाचा - अंधेरी एमआयडीसीतील इमारतीला पुन्हा लागली आग, जीवितहानी नाही

सागरने त्या महिलेला शिवीगाळ करू नका, असे सांगितले. मात्र, त्यानंतर त्या महिलेसोबत असलेल्या सहा पुरुष आणि सहा महिलांनी देखील सागरसह कुटुंबीयांना लाथा-बुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. सागरच्या पत्नीने आणि आईने त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान सागरचा जागीच मृत्यू झाला.

त्यानंतर सागरच्या पत्नीने रेल्वेमधील चेन तीन वेळा ओढली मात्र, गाडी थांबून पुन्हा सुरू झाली. सागरच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. गाडीतील एका प्रवाशाने फोनद्वारे पोलिसांना याबाबत कळवले. गाडी दौंड रेल्वे स्टेशन येथे आल्यानंतर दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्यातील पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंत सागरचा मृतदेह दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.

Last Updated : Feb 14, 2020, 11:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.