बारामती - कौटुंबिक व संपत्तीच्या वादातून वडिलांवर गोळीबार करून स्वतःव र गोळी झाडल्याची घटना बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रूक या गावात घडली आहे. या घटनेत बारामती तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक दीपक धनवंत खोमणे (50) राहणार कोऱ्हाळे बुद्रुक यांनी आपले वडील धनवंत धोंडिबा खोमणे (75) यांच्यावर बंदुकीतून गोळी झाडली आहे.
पिता-पुत्रात अनेक दिवसांपासून संपत्तीचा वाद होता. त्यामुळे त्यांची सतत कुरबुरी होत असे. आज काटेवाडी रस्त्याने दीपक खोमणे यांच्या उसाला तोड आल्यामुळे ते सकाळी आपल्या शेतात गेले होते. त्यानंतर शेतातील विहिरीजवळ पिता-पुत्रात शाब्दिक चकमक व झटापट झाली. राग अनावर होत दीपक खोंडे यांनी आपल्याजवळील बंदुकीतून धनवंत खोमणे यांच्या छातीत गोळी झाडली. त्यांना बारामती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असताना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, दीपक खोमणे जखमी झाले आहेत.