पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. शिरूर येथील न्यायालय परिसरात जावयाकडूनच सासू आणि पत्नीवर गोळीबार (Shooting in Shirur Court) झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपी तरुण हा माजी सैनिक असल्याची माहिती आहे. दाम्पत्याच्या घटस्फोटाचा दावा कोर्टात दाखल आहे. याच कारणावरून पतीने पत्नी आणि सासूवर गोळीबार केल्याच सांगितले जात आहे.
पत्नीचा जागीच मृत्यू - या गोळीबारात पत्नीचा जागीच मृत्यू (His Wife Died & Mother-in-Law in Critical Condition) तर सासूची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक असल्याचे प्रथम दर्शनी समोर येत आहे. सासूवर शिरूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू शिरूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.
परवाना प्राप्त पिस्तूलमधून गोळीबार - सकाळी शिरूर येथे पाटबंधारे विभाग कार्यालय परिसरात दीपक पांडुरंग ढवळे (माजी सैनिक, राहणार अंबरनाथ, जिल्हा ठाणे) याने त्याच्या परवाना प्राप्त पिस्तूलमधून त्याची पत्नी मंजुळा रंगनाथ झांबरे (राहणार वाडेगव्हाण, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर ) व तिच्यासोबत असलेली तिची आई यांच्यावर गोळीबार केला. त्यांची पोटगीची केस न्यायालयात चालू होती. आरोपीसोबत त्याचा सख्खा भाऊ संदीप पांडुरंग ढवळे हा होता. दोघांना रांजणगाव व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी रिक्षा आणि शस्त्रांसह ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा : मालेगावात किरकोळ कारणातून एकावर गोळीबार